अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश, आता नांदेडवरुन विमानाने तिरुपतीला जाता येणार, पाहा फ्लाईटचं टाईम-टेबल

आता नांदेड-तिरुपती व्हाया हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे. सध्या नांदेड शहर हे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, कोल्हापूर या महानगरांशी विमानाने जोडले आहे. यात आता तिरुपतीची भर पडली आहे.

अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश, आता नांदेडवरुन विमानाने तिरुपतीला जाता येणार, पाहा फ्लाईटचं टाईम-टेबल
नांदेड ते तिरुपती विमानसेवा
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 7:03 AM

नांदेड : आंध्रप्रदेश राज्यातील श्री तिरुपती बालाजी देवस्थानचे (Tirupati Balaji) जागतिक पातळीवर अनन्य साधारण महत्व आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो भाविक तिथे जात असतात. तिरुपतीला जाण्यासाठी नांदेडहून विमानसेवा असावी अशी मागणी भाविकांची होती. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) मोठ्या प्रयत्नात होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता नांदेड-तिरुपती व्हाया हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे.

नांदेडवरुन टेकऑफ, तिरुपतीमध्ये लँडिंग

नांदेड येथे गुरु-ता-गद्दीच्या काळात 2008 मध्ये श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळाची उभारणी करण्यात आली. या विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा उपलब्ध आहे. सध्या नांदेड शहर हे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, कोल्हापूर या महानगरांशी विमानाने जोडले आहे. यात आता तिरुपतीची भर पडली आहे.

आठवड्यातील तीन दिवस नांदेडवरुन तिरुपतीसाठी विमान

मंगळवार, बुधवार, गुरूवार या दिवशी हे विमान तिरूपती- हैदराबाद-नांदेड-मुंबई – कोल्हापूर असा प्रवास करून त्याच दिवशी त्याच मार्गाने परतीच्या प्रवासासाठी तिरूपतीकडे निघणार आहे.

सदरील तीन दिवशी सायंकाळी 6.10 मिनिटाला हे विमान नांदेड येथून निघून रात्री 9.10 मिनिटाला ते तिरूपती येथे पोहोचेल. तर तिरूपतीहून याच दिवशी सकाळी 7.05 वाजता तिरूपतीहून निघणारे हे विमान नांदेडला सकाळी 10.25 मिनिटाला पोहचणार आहे. त्यानंतर मुंबई – कोल्हापूरसाठी आकाशात झेपावणार आहे. यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. या विमानाचे किमान भाडे 3,999 रुपये आकारण्यात आले.  पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अशोक चव्हाण यांच्या मागणीला यश

नांदेडहून तिरूपतीकडे जाणाऱ्या भाविकांची थेट विमानसेवेची मागणी अनेक दिवसांपासून होती. यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ट्रुजेट विमान कंपनीशी अनेकदा चर्चा केली होती. त्याचीच फलश्रृती म्हणून सध्या सुरु असलेल्या विमानसेवेचा विस्तार करत ती आता तिरूपतीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

(flight to Nanded to Tirupati, see flight timetable)

हे ही वाचा :

घरची परिस्थिती हालाखीची, त्यात कोरोनाची वक्रदृष्टी, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यावर मजुरीची वेळ

कोरोनाचा प्रकोप आणि महापुराचा हाहाकार, वाढदिवस साजरा करणार नाही; खासदार चिखलीकरांचा जन्मदिन ‘सेवा सप्ताह’

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.