पावसाचं अक्राळविक्राळ रुप, सुन्न करणारं सारं काही, चंद्रपूरमध्ये हाहा:कार

चंद्रपूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरुय. गुरुवारी रात्री झालेल्या पावसानं इरई नदीला पूर आला आणि चंद्रपुरात होत्याचं नव्हतं झालंय. चंद्रपूर शहरातील महापुराचं विदारक चित्र सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट!

पावसाचं अक्राळविक्राळ रुप, सुन्न करणारं सारं काही, चंद्रपूरमध्ये हाहा:कार
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 10:41 PM

चंद्रपूर | 28 जुलै 2023 : गेल्या 24 तासात चंद्रपूर तालुक्यासह जिल्ह्यातील 5 तालुक्यात अतिवृष्टी झालीय. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या 54 टक्के इतका पाऊस झालाय. मुसळधार पावसानं केवळ इरईच नाही तर झरपट नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झालीय. चंद्रपूर शहराच्या उत्तरेला इरई धरण आहे. धरण परिसरात गेला आठवडाभर तुफान पाऊस झाल्यानं इरई धरण तब्बल 87 टक्के भरलंय. धरणाचे 7 पैकी 2 दरवाजे 0.25 मीटरनं उघडण्यात आलेत. त्यामुळं इरई नदीत सकाळी 10 वाजता पाण्याचा विसर्ग सुरु झाला. इरई नदी चंद्रपूर शहराच्या पश्चिमेकडून वाहते आणि पुढे जाऊन दक्षिणेकडील वर्धा नदीला मिळते.

मात्र, वर्धा नदीलाच पूर आल्यानं इरईचं पाणी वर्धा नदीत मिसळण्यात अडचण निर्माण झाली. अशावेळी इरई नदीचं पाणी पात्र सोडून चंद्रपूर शहरात घुसलंय. इरई धरणाचे अजूनही काही दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं पाऊस थांबला नाही तर शहराला असलेला धोका अजूनच वाढण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेलाय. आतापर्यंत जवळपास हजार लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र, हे रेस्क्यू ऑपरेशनही काही सोपं नव्हतं. रेस्क्यू ऑपरेशनवेळी एक अपघात घडला. मात्र यात कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. चंद्रपुरात पावसानं थैमान घातल्यानं वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोणते रस्ते बंद?

राजुरा-बल्लारपूर राजूरा-सास्ती धानोरा-भोयगाव गौवरी कॉलनी-पोवणी कोरपना-कोडशी रूपापेठ-मांडवा जांभूळधरा-उमरहिरा पिपरी-शेरज, पारडी-रुपापेठ कोडशी-पिपरी कोरपना-हातलोणी कुसळ-कातलाबोडी-कोरपना शेरज-हेटी

रस्त्यांवर अनेक तासांपासून वाहतूक बंद

अनेक मार्गांवरील वाहतूक बंद असल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झालीय. त्यामुळे रस्त्यांवर अनेक तासांपासून वाहनं उभी आहेत. तर काही जण पुराच्या पाण्यातूनच वाट काढताना दिसतायंत. पुराचं पाणी शहरात तर घुसलंच. दुसरीकडे शेतीचंही मोठं नुकसान झालंय.

कालपर्यंत वाऱ्यानं डोलणारी पिकं अक्षरश: झोपली आहेत. काही ठिकाणी शेतातली मातीही खरडून गेलीय. त्यामुळे आता करायचं काय? असा प्रश्न इथला बळीराजा विचारतोय.

विरोधकांकडून सरकारवर निशाणा

चंद्रपूरसह राज्यभरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवर आता विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. तर सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं सत्ताधारी नेते सांगत आहेत.

मागील वर्षातही इरई नदीला पूर आला होता. त्यावेळी रहिमतनगर परिसर पाण्याखाली गेला होता. आता सरकार पूरग्रस्तांना मदत करेलही, मात्र ती तातडीनं मिळावी. आज ज्यांचे संसार उघड्यावर पडलेत, ज्यांना घरदार सोडून निवारा केंद्रावर राहावं लागतंय. त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी अशी अपेक्षा या पूरग्रस्तांना आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.