बोलेरोने चार जण प्रवास करत होते, टायर फुटला नि बोलेरो उभ्या ट्रकला धडकली

शहरालगत पडोली-घुग्घूस मार्गावर बोलेरो वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे बोलेरो वाहन विरुद्ध लेनला गेले. त्याच वेळेस बोलेरोची उभ्या ट्रकशी जबर धडक झाली.

बोलेरोने चार जण प्रवास करत होते, टायर फुटला नि बोलेरो उभ्या ट्रकला धडकली
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 5:06 PM

नीलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : पडोली-घुग्घूस मार्गावर बोलेरोने चार जण प्रवास करत होते. तेवढ्यात बोलेरोचा टायर फुटला. त्यानंतर बोलेरे अनियंत्रित झाली. ही अनियंत्रित गाडी थेट उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली. यामुळे बोलेरोतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर शहरालगत बोलेरोने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. मृतकांमध्ये 2 सख्खे भाऊ आणि त्यांच्या पत्नींचा समावेश आहे.

मारेगाव येथील चार जणांचा मृत्यू

शहरालगत पडोली-घुग्घूस मार्गावर बोलेरो वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे बोलेरो वाहन विरुद्ध लेनला गेले. त्याच वेळेस बोलेरोची उभ्या ट्रकशी जबर धडक झाली. यात बोलेरो वाहनामधील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

अशी आहेत मृतकांची नावे

घुग्घूस-पडोली मार्गावरील अहमद लॉन (चिंचाळा) जवळ हा अपघात घडला. रफिक नबी वस्ताद शेख, संजिदा रफिक शेख, युसुफ नबी वस्ताद शेख आणि मुमताज युसूफ शेख अशी मृतकांची नावं आहेत. पडोली पोलिसांनी घटनास्थळी पोचत परिस्थिती हाताळली.

अपघात कसे कमी करता येतील

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. गाजावाजा करून रस्ते अपघात कमी करण्याचा प्रयत्न केला. तरी अपघात होत आहेत. त्यामुळे अपघात कसे कमी करता येतील, यासाठी प्रशासनावर मोठा दबाव आहे. रस्ते चकाचक झाले. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला. लवकर पोहचता येते म्हणून गाड्यांचा वेग वाढला. हा वाढता वेग प्रवाशांच्या जीवावर उठला असल्याचे चित्र आहे.

घटनेनंतर पडोली पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनेचा पंचनामा केला. रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा ट्रक कशासाठी ठेवला होता, असा प्रश्न उपस्थित झाला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.