Tulja Bhavani : तुळजाभवानी देवीच्या 4 पुजाऱ्यांवर 3 महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदी; सोने पळवणे, भाविकांना शिवीगाळ करणे भोवले

तुळजाभवानी देवीच्या एका भक्ताने देवीस अर्पण करण्यासाठी 2 तोळे सोन्याचे मंगळसूत्र पुजारी बर्वे व पिसे यांच्याकडे 8 मे रोजी दिले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन या दोघांनी संगनमत करून सोन्याचे मंगळसूत्र देवीस अर्पण केल्याचे भासविले व ते मंगळसूत्र पूजेच्या ताटात लपवून ठेवले.

Tulja Bhavani : तुळजाभवानी देवीच्या 4 पुजाऱ्यांवर 3 महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदी; सोने पळवणे, भाविकांना शिवीगाळ करणे भोवले
तुळजाभवानी मंदिरात पुजेला होणार प्रारंभImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 10:43 PM

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (Tulja Bhavani) मातेच्या मंदिरातील 4 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने 3 महिन्यासाठी मंदिर प्रवेश बंदी (Banned)ची कारवाई केली आहे. त्यांना 6 महिने प्रवेश बंदी का करू नये अशा लेखी नोटीसा (Notice) बजावण्यात आल्या आहेत. भाविकांनी देवीला अर्पण करण्यासाठी दिलेले सोने पळविणे, भाविकांना विनाकारण शिवीगाळ करणे व न्यायाधीश यांच्याशी वाद घालणे या पुजाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. मंदिर संस्थानकडे भाविकांनी केलेल्या तक्रारी व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पुजारी दत्ता सुभाष बर्वे, नवनाथ आबासाहेब पिसे, संभाजी नेताजी क्षीरसागर आणि अरविंद अपसिंगेकर अशी या 4 पुजाऱ्यांची नावे आहेत.

सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरुन कारवाई

तुळजाभवानी देवीच्या एका भक्ताने देवीस अर्पण करण्यासाठी 2 तोळे सोन्याचे मंगळसूत्र पुजारी बर्वे व पिसे यांच्याकडे 8 मे रोजी दिले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन या दोघांनी संगनमत करून सोन्याचे मंगळसूत्र देवीस अर्पण केल्याचे भासविले व ते मंगळसूत्र पूजेच्या ताटात लपवून ठेवले. त्यांच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या असून याबाबत सुरक्षा रक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली.

चार पुजाऱ्यांवर 3 महिने प्रवेशबंदीची कारवाई

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील भक्त बालाजी ढोमणे पाटील हे दर्शन घेत असताना पुजारी क्षीरसागर यांनी मुखदर्शन व धर्मदर्शन रांगेत जाऊन शिवीगाळ केली व 751 रुपये इतक्या पैशाची मागणी केली. देवीचे दर्शन भाविकांना घेण्यासाठी शिव्या खाव्या लागतील हे मोठे दुर्दैव असल्याची तक्रार भाविकाने मंदिर संस्थानच्या व्हॉट्सअॅपवर केली त्यांनतर त्याची दखल घेऊन 3 महिने मंदिर प्रवेशबंदीची कारवाई केली. सातारा येथील जिल्हा न्यायाधीश विवेक कठारे हे सहकुटुंब देवीदर्शनासाठी आले असता पुजारी अपसिंगेकर यांनी विनाकारण कठारे यांच्याशी वाद घालत चुकीची वागणूक दिली. याबाबत कठारे यांनी मंदिर संस्थानच्या व्हाट्स अॅपवर तसेच तक्रार रजिस्टरमध्ये लेखी तक्रार दिली. या घटनेच्या सीसीटीव्ही आधारे अपसिंगेकर यांना 3 महिने प्रवेश बंदी केली आहे. चारही पुजाऱ्यांवर देऊळ कवायात कलम 24 व 25 नुसार प्रवेशबंदीची कारवाई मंदिर संस्थानने केली आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.