Video Akola Tiger | अस्वल-वाघाचा मुक्तसंचार, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

वाढत्या उन्हामुळं प्राणी पाण्यासाठी जंगलाबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळं प्राण्यांचा मुक्ससंचार दिसत आहे. वाघांसह अस्वलाचा मुक्तसंचार कॅमेऱ्यात कैद झालाय.

Video Akola Tiger | अस्वल-वाघाचा मुक्तसंचार, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात धारगड येथे भटकंती करताना अस्वल व वाघ. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 4:04 PM

अकोला : अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या शहानुर धारगड सफारी दरम्यान वाघासह प्राण्यांचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद झालाय. वनविभागाचे अधिकारी सुनील वाकोडे ( Forest Department Forest Officer Sunil Wakode) यांनी हे आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. वाघ, अस्वल आदी प्राणी जंगलात मुक्तपणे संचार करताना जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. मुक्तसंचार करणाऱ्या अस्वल वाघाची (Bear, Tiger scene) ही खास दृश्य. विदर्भात पुन्हा उन्हाची तीव्र लाट आली आहे. नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये सूर्याचा प्रकोप दिसून येत आहे. काल अकोल्याचा पारा 42.9 अंशांवर गेला. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. जगात आठव्या क्रमांकाचे हॉट शहर ठरले. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी होताच लाटेने डोके वर काढले आहे. गडचिरोलीचा अपवाद वगळता संपूर्ण विदर्भात सध्या उन्हाची तीव्र लाट पसरली आहे. उन्हाचा फटका बसत आहे. आणखी 4 ते 5 दिवस ही तीव्रता राहणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने व्यक्त केला. नागपूर हवामान विभागाचे उपसंचालक एम एल साहू यांनी ही माहिती दिली.

बिबट्याने बैलाला केले ठार

अकोला वनविभाग अंतर्गत येत असलेल्या चिंचोली गणु शेतशिवारात बिबट्याने बैलाला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. चिंचोली गणु येथील शेतकरी गणेश गोतमारे हे त्यांच्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेले होते. जनावरे चारत असताना बिबट्याने अचानक बैलावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. याबाबत गणेश गोतमारे यांनी अकोला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती दिली. पण वनविभाग कर्मचारी घटनास्थळी पंचनाम्यासाठी आले नाहीत.

पाहा व्हिडीओ

शेतकरी भयभीत

या परिसरात रात्रपाळीला हरभरा, गहू, तीळ, हायब्रीडसाठी रखवालीसाठी शेतकरी शेतात जातात. आता ते शेतकरी भयभीत झाले आहेत. तसेच या परिसरात वनविभाग कर्मचारी येत नसल्याने या भागात कोण कर्मचारी आहेत याची ही कल्पना नाही. त्यामुळे संपर्क कोणासोबत करायचा हा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. वनविभाग कर्मचारी यांनी दखल घेऊन या परिसरात असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या परिसरातील तामसी येथील विजय पातोडे, धाडी बल्लाडी येथील पोलीस पाटील शिंदे, अजय बाबर, प्रशांत अंभोरे, गणेश गोतमारे, पिपळगाव येथील दिनेश फाळके आदी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पाहा व्हिडीओ

भीम जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्याची परवानगी द्या! Jaideep Kawade यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

Bhandara Accident | कारधा पुलावर ट्रेलरची दुचाकीला धडक; काकू-पुतण्या ठार, सून जखमी

Nagpur Crime | प्रेमीयुगुल घरून पळाले, नातेवाईक शोधायला गेले, दोघांनीही विहिरीत उडी मारून संपविले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.