Video Akola Freestyle | अकोला शहरातील शासकीय विश्रामगृहात फ्रीस्टाईल! दोन गटांत चांगलीच हाणामारी
अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात गर्दी जमली होती. या गर्दीत अचानक एकमेकांना मारपीट करतानाचं दृश्य दिसलं. दोन-तीन तरुण एक तरुणाला लाताबुक्यांनी मारहाण करत होते. अश्लील शब्दात शिविगाळ करत होते.
अकोला : अकोला शहरातल्या शासकीय विश्रामगृहामध्ये आज सकाळच्या सुमारास काही जणांमध्ये फ्रीस्टाइल झाली. ही फ्रीस्टाईल नेमकी कोणत्या कारणाने झाली, हे माहीत नाही. या विश्रामगृह येथे आज पालकमंत्री (Guardian Minister) बच्चू कडू (Bachchu Kadu) येणार आहेत. त्यामुळे सकाळपासूनच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी (Prahar Activists) गर्दी केली होती. अचानक या विश्राम गृहाच्या परिसरामध्ये बाहेरील युवक आले. त्यांनी एकमेकाला मारण्यास सुरुवात केली. एकमेकांवर दगडफेक केली. त्यामध्ये काही युवक जखमी झाले. यात काही जणांनी मध्यस्थी केल्याने हा वाद निवळला. पण असे शासकीय जागेत जाऊन राडा करणे यामुळे शासकीय विश्रामगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाहा व्हिडीओ
अकोला शहरातील शासकीय विश्रामगृहात फ्रीस्टाईल.. pic.twitter.com/JzpkviFwUD
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) May 4, 2022
एका तरुणाला मारहाण
अकोल्यातील शासकीय विश्रामगृहातील आजची सकाळ. पालकमंत्री येणार म्हणून कार्यकर्ते जमले होते. काही नागरिकही आपल्या समस्या घेऊन आले होते. त्यामुळं याठिकाणी गर्दी जमली होती. या गर्दीत अचानक एकमेकांना मारपीट करतानाचं दृश्य दिसलं. दोन-तीन तरुण एक तरुणाला लाताबुक्यांनी मारहाण करत होते. अश्लील शब्दात शिविगाळ करत होते. काही तरुण त्यांच्यामधील वाद सोडविण्याचा प्रयत्न करत होते. पण, ते काही थांबायला तयार नव्हते. हात असो की, हात असं जमेल तसं एकमेकांवर उगारत होते.
कॅमेऱ्यात व्हिडीओ चित्रीकरण
दुसऱ्या एक व्हिडीओत शासकीय विश्रामगृहात गर्दी दिसून येते. या गर्दीत कार्यकर्ते धावपळ करताना दिसतात. एकानं तर अंगावरचे कपडे काढले आहेत. दुसरा तरुण त्याला समज देत आहे. यानंतर अशी काही गडबड केली, तर आणखी वाजवीण, असंच काहीतरी सांगत आहे. या घटनेमुळं कार्यकर्ते गोंधळात पडले. हे तरुण कोण आहेत, कशासाठी एकमेकांवर तुटून पडले, याची चर्चा चांगलीच रंगली. पण, ते कोण आहेत, हे तूर्तास समजले नाही. मात्र, त्यांनी एकमेकांना चांगलेच बदडले. हातबुक्यांनी मारहाण केल्यानं काही जणांनी त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले.