लाडका कोंबडा मेला, मालकाकडून वाजत-गाजत अंत्ययात्रा, गावकऱ्यांची मोठी गर्दी
लाडका कोंबडा मेल्यामुळे त्याची अंत्ययात्रा काढत त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आलेयत.
नांदेड : लाडका कोंबडा मेल्यामुळे त्याची अंत्ययात्रा काढत त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आलेयत. मुखेड तालुक्यातील सावरगाव माळ गावातील हा प्रकार आहे. माळ गावातील शंकर कोकले यांनी कोंबड्याची अंत्ययात्रा काढली आहे. (funeral procession of Rooster held in Nanded video went viral)
मांजरीने चावा घेतल्यामुळे कोंबडा आजारी पडला
शंकर कोकले यांनी दहा वर्षांपासून एक कोंबडा पाळला होता. राजा नावाच्या या कोंबड्यावर गावकऱ्यांचेदेखील विशेष प्रेम होते. मात्र, मांजरीने चावा घेतल्यामुळे हा कोंबडा आजारी पडला. त्यानंतर मालकाने आजारी पडलेल्या कोबंड्यावर उपचार केले. मात्र, उपचार करुनही या कोंबड्याचा जीव वाचला नाही.
कोंबड्यावर केले विधिवत अंत्यसंस्कार
त्यानंतर शंकर कोकले यांनी त्यांच्या आवडत्या अशा राजा या कोंबड्याची वाजतगाजत अंत्ययात्रा काढली. तसेच त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे कोंबड्याच्या या अंत्यविधीला गावातील लोकदेखील मोठ्या संख्येने हजर होते.
पाहा व्हिडीओ :
कोंबड्याची अंत्ययात्रा काढल्यामुळे एकच चर्चा
पाळीव प्राण्यांबद्दल असलेला लोकांचा स्नेह आपण अनेकदा पाहिलेला आहे. मात्र कोंबड्या सारख्या पक्ष्याची अंत्ययात्रा पहिल्यांदाच या निमित्ताने पहायला मिळाली आहे. ही अत्यंयात्रा सध्या चर्चेचा विषय ठरली असून शंकर कोकले यांचे अनेकजण कौतुक करत आहेत. तर एका कोंबड्याची अंत्ययात्रा काढली म्हणून काही लोक हा व्हिडीओ मोठ्या चवीने पाहत आहेत.
इतर बातम्या :
मीराबाई चानूचं रौप्य पदक सुवर्णमध्ये बदलण्याची शक्यता, चीनची वेटलिफ्टर डोपिंगमध्ये दोषी?
झारखंड सरकार पाडण्याचा केंद्राचा डाव, बावकुळेंसह मोहित कंबोज यांचंही एफआयआरमध्ये नाव: नवाब मलिक
(funeral procession of Rooster held in Nanded video went viral)