Girish Mahajan : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह, राजकीय नेते कोविडच्या विळख्यात

राज्यातील सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारांपाठोपाठ विरोधी भाजपच्या नेत्यांना देखील कोरोनानं गाठलं आहे. भाजपचे संकटमोचक जामनेरचे आमदार माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

Girish Mahajan : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह, राजकीय नेते कोविडच्या विळख्यात
Girish Mahajan Corona Positive
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 11:32 AM

जळगाव: राज्यातील बड्या नेत्यांना कोरोना संसर्ग (Corona) होण्याची मालिका सुरुच आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारांपाठोपाठ विरोधी भाजपच्या नेत्यांना देखील कोरोनानं गाठलं आहे. भाजपचे संकटमोचक जामनेरचे आमदार माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती.

गिरीश महाजन घरीचं क्वारंटाईन

गिरीश महाजन यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वत: ला घरीचं क्वारंटाईन करुन घेतलं आहे. ते घरीच उपचार करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्का त आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. कालचं गिरीश महाजन यांनी राज्यातील विविध प्रश्न, नागपूरमध्ये अतिरेक्यांनी केलेली रेकी आणि पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत घडलेल्या प्रकारावरुन काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. यावेळी खासदार रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या.

रावसाहेब दावने यांना कोरोना

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षण जाणवत असल्याने आपण टेस्ट केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दानवे यांनी ट्विट तसेच फेसबुक पोस्ट केलीय. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेत असून संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन त्यांनी केलंय.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार देखील कोरोना बाधित

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरनासृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्या विलगीकरणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात घेत आहेत.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर कोरोना बाधित

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना कोरोना संसर्ग झाल्याचं 5 जानेवारीला समोर आलं होत. तर, भाजप आमदार अतुल भातखळकर यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे.

देशात 1 लाख 41 हजार986 कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्रासह देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढतेय. देशातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 41 हजार 986 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 285 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनामृळं मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 4 लाख 83 हजार 463 वर पोहोचली आहे. तर, देशभरातील बाधितांची संख्या 3 कोटी 53 लाख 68 हजार 372 वर पोहोचली आहे.

इतर बातम्या:

mAadhaar App सेवांसाठी नोंदणीकृत मोबाईलचा करा वापर, अनोंदणीकृत मोबाईल धारकांना नाही मिळणार सुविधा 

Chavan Vs Fadnavis| विद्या चव्हाण यांच्या सुनेवर आरोपाचं प्रकरण काय होतं, ज्यावर अमृता फडणवीसांनी बोट ठेवलंय?

Girish Mahajan tested corona positive gave information via social media post appeal those who came in contact to test

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.