Gadchiroli Murder : गडचिरोलीत अज्ञात कारणावरुन प्रियकराकडून प्रेयसीची अपहरण करुन हत्या

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला. आठवडाभर कसून तपास केल्यानंतर मुलीच्या प्रियकरानेच मुलीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने हत्येनंतर मृतदेह स्वतःच्या घराच्या मागच्या जंगलात पुरला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.

Gadchiroli Murder : गडचिरोलीत अज्ञात कारणावरुन प्रियकराकडून प्रेयसीची अपहरण करुन हत्या
बहिणीच्या लग्नाची धामधूम, भावाचा ह्र्दयविकाराने मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 6:48 PM

गडचिरोली : प्रियकरानेच प्रेयसीचे अपहरण (Kidnapping) करुन तिची हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना गडचिरोलीत उघडकीस आली आहे. अविनाश रंगा मडावी असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. मंडवीने सात दिवसापूर्वी प्रेयसीचे अपहरण करुन हत्या केली आणि मृतदेह घराच्या मागच्या जंगलात पुरल्याचे बुधवारी उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळाहून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी अविनाश मडावी व त्याचा मित्र फरार असून पुढील तपास मन्नेराजाराम पोलिस करीत आहेत. (Girlfriend abducted and murdered by boyfriend in Gadchiroli)

सात दिवसांपासून बेपत्ता होती मुलगी

भामरागड तालुक्यातील मन्ने राजाराम येथील अविनाश मडावी याचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. सदर मुलगी सात दिवसांपूर्वी अचनाक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी आसपासच्या परिसरात मुलीचा शोध घेतला. मात्र मुलगी कुठेही सापडली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी मन्ने राजाराम पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला. आठवडाभर कसून तपास केल्यानंतर मुलीच्या प्रियकरानेच मुलीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने हत्येनंतर मृतदेह स्वतःच्या घराच्या मागच्या जंगलात पुरला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मात्र आरोपी आणि त्याचा साथीदार फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

नांदेडमध्ये पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

कौटुंबिक वादातून पतीने कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील बेळकोणी गावात घडली आहे. नामदेव तोकडवाल असे आरोपी पतीचे तर रंजना तोकडवाल असे मयत पत्नीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दोघे पती-पत्नी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून रागाच्या भरात पतीने हातातील कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यावर घाव घातला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रामतीर्थ पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. (Girlfriend abducted and murdered by boyfriend in Gadchiroli)

इतर बातम्या

Parali Morcha : नांदेडमधील संजय बियाणी हत्या प्रकरण, आरोपींच्या अटकेसाठी माहेश्वरी समाजाचा मूक मोर्चा

नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला आजीने पाठवले 25 वर्षे तुरुंगात; पोक्सो कोर्टाने दिला तीन महिन्यांत निकाल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.