वडेट्टीवार म्हणाले, खात्यावर पैसे पाठवू, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, बँक खाते नाही त्यांना रोख रक्कम द्या!
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जो काय निर्णय घेतला आहे, तो ज्यांची बँक खाती आहेत त्यांना थेट मदत देण्यास काहीच अडचण नाही. मात्र ज्यांची बँक खाती नाहीत, त्यांना शासनाने रोख रक्कम दिली पाहिजे"
कराड, सातारा : ज्यांची बँक खाती नाहीत त्या पूरग्रस्तांना शासनाने मदतीची रोख रक्कम दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली. राज्य सरकार पूरग्रस्तांच्या (Flood) खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम पाठवणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली होती. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जो काय निर्णय घेतला आहे, तो ज्यांची बँक खाती आहेत त्यांना थेट मदत देण्यास काहीच अडचण नाही. मात्र ज्यांची बँक खाती नाहीत, त्यांना शासनाने रोख रक्कम दिली पाहिजे”
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसंच बाधितांना मदतीचे वाटप केले. यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी बाधित लोकांना लवकरात लवकर मदत देण्याच्या सूचनाही केल्या.
पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्या शुक्रवारपासून ही 10 हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर केले आहेत. हे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर अनेक आरोप होतात. पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
संबंधित बातम्या
पूरग्रस्तांच्या खात्यावर शुक्रवारपासून 10 हजार रुपये जमा होणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती