Konkan Rain : कोकण, कोल्हापुरात तुफान पाऊस, NDRF ची पथकं रवाना, रस्ते, रेल्वे वाहतूक रखडली
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं धूमशान (Konkan Railway) पाहायला मिळत आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्याला (Ratnagiri) पावसाने झोडपून काढलं आहे.
रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं धूमशान (Konkan Railway) पाहायला मिळत आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्याला (Ratnagiri) पावसाने झोडपून काढलं आहे. चिपळूण शहरातील (Chiplun rain) बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस खबरदारीचे आहेत. तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही रोखण्यात आली आहे.
रत्नागिरीतील बहुतेक नद्यांना महापूर आला आहे. तर बाव नदीनेही रौद्ररुप धारण केलं आहे. तर काजळी नदीही दुथडी भरुन वाहत आहे. चिपळूणमध्ये बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. दुकानं, घरं पाण्याने भरली आहेत.
रायगडमधील महाड शहरात पुराचा पहिला बळी गेला. टेरेसवरून पडून एकाचा मृत्यू झाला. टेरेस वरून पूर पहात असताना तोल जाऊन खाली कोसळल्याने ही दुर्घटना घडली. महाडच्या रोहिदास नगर भागात ही घटना आहे. संजय नारखेडे असे 50 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे.
चिपळूण शहरातील वशिष्ठी आणि शिव नदीला पूर, महामार्ग ठप्प
चिपळूण शहरातील वशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला आहे. त्यामुळे बहदूरशेक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई गोवा आणि चिपळूण कराड महामार्ग ठप्प झाले आहेत. 2005 नंतर प्रथमच भरले एवढे पाणी भरले आहे.
रत्नागिरी-चिपळूण-कराड मार्गावर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प
रत्नागिरी -चिपळूण – कराड मार्गावर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. खेर्डी बाजारपेठेत भरले अनेक ठिकाणी पाणी भरलं.
कोल्हापुरातील सखल भागात पुराचं पाणी, NDRF च्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना
NDRF च्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कोल्हापूर शहरासाठी एक तर शिरोळसाठी एक टीम रवाना झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सकल भागात पुराच पाणी साचलंआहे. दुपारपर्यंत NDRF च्या टीम कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
VIDEO : कोकणात तुफान पाऊस
संबंधित बातम्या
Mumbai Rains Maharashtra Monsoon Live | रत्नागिरीत बावनदीला पूर, पुलावरील वाहतूक थांबवली