Hirkaniwadi landslide : रायगडमध्ये दुर्घटनांची मालिका सुरुच, आता हिरकणीवाडीत दरड कोसळली
रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत (Hirkaniwadi landslide Raigad) दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे.
रायगड : रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत (Hirkaniwadi landslide Raigad) दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे. इथे सतत पाऊस होत आहे. दरड कोसळली असली तरी सध्या तरी घरांना नुकसान झालं नाही. मात्र हिरकणीवाडीतील नागरिक भयभीत झाले आहेत. पाचाड गावाजवळ ही हिरकणीवाडी आहे. हिरकणीवाडीतील नागरिकांना पाचाड गावात हलवलं जात आहे. (Hirkaniwadi landslide at Raigad in Maharashtra after Taliye rescue operation began)
हिरकणीवाडी हा डोंगराळ भाग आहे. महाड शहरापासून जवळपास 25 ते 30 किमी अंतरावर हिरकणीवाडी आहे. इथे जोरदार पाऊस असल्याने यंत्रणा वेळेत पोहोचणे कठीण आहे. सध्या हिरकणीवाडीत काही नुकसान झालं नसलं तरी सध्याचं वातावरण पाहता, खबरदारी घेणं आवश्यक आहे.
रायगड जिल्ह्यातील तळीये गावातही दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. 22 जुलैला दरड कोसळल्यामुळे आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरडीखाली अजूनही नागरिक अडकल्याची भीती आहे. इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. त्यातच आता रायगड किल्ल्याच्या पायथ्याशीही हिरकणीवाडीत दरड कोसळल्याने अख्खा रायगड जिल्ह्यात दुर्घटनांच्या मालिकांनी हादरुन गेला आहे.
VIDEO : हिरकणीवाडीत दरड कोसळली
तळीयेत दुर्घटना
महाड तालुक्यातील तळीये गावात होत्याचं नव्हतं झालं आहे. कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या 35 घरांतील जवळपास 70-80 माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घरं उद्ध्वस्त झालीत, पण या घरातील माणसं गाढली गेली आहेत.
संबंधित बातम्या Taliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं