Nandurbar Crime | नंदुरबारातील हनी ट्रॅप प्रकरण, 19 वर्षीय तरुणीवर गुन्हा, 3 आरोपी अटकेत, 3 फरार

नंदुरबार येथील हनी ट्रॅप प्रकरणी आतापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चौथा गुन्हा काल 19 वर्षीय तरुणीवर दाखल करण्यात आला. ती सध्या फरार आहे. यापूर्वी या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली. तीन आरोपी फरार आहेत.

Nandurbar Crime | नंदुरबारातील हनी ट्रॅप प्रकरण, 19 वर्षीय तरुणीवर गुन्हा, 3 आरोपी अटकेत, 3 फरार
नंदुरबारातील हनी ट्रप प्रकरण, 19 वर्षीय तरुणीवर गुन्हा
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 12:47 PM

नंदुरबार : जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्याने जिल्ह्यात अनेक मोठे व्यापारी (Trader) वर्ग आहे. या व्यापाऱ्यांना एका सक्रिय टोळीने (Gang) अश्लील व्हिडिओ कॉल आणि अश्लील मेसेजेस यावरून खंडणी (Ransom) मागण्याची सुरुवात गेल्या काही महिन्यांपासून केली. मात्र ही बाब पोलीस स्टेशनपर्यंत येत नसल्याने या टोळीला प्रोत्साहन मिळत होते. मात्र एका पीडित व्यक्तीने हिम्मत करून पोलीस अधीक्षक यांना भेटून सर्व घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना एक टीम तयार केली. या टोळीला कुठल्याही परिस्थितीत शिक्षा झाली पाहिजे, असे आदेश दिल्यानंतर तात्काळ सापळा रचण्यात आला. या टोळीला शहादा येथे खंडणी घेताना रंगेहात पकडण्यात आलं. त्यामध्ये  एक महिला, एक पोलीस कर्मचारी आणि एका तथाकथित पत्रकाराचा समावेश होता.

हनी ट्रॅप प्रकरणी चौथा गुन्हा दाखल

नंदुरबार जिल्ह्यात हनी ट्रॅपच्या प्रकरणात वाढ झाल्याचा दिसून येत आहे. आणखीन एक तक्रारी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी या विरोधात कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. तीन जणांच्या टोळीला अटक झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सर्व जिल्हावासीयांना आवाहन केलं होतं. ज्या व्यक्ती सोबत हा प्रकार घडला असेल त्यांनी समोर येऊन तक्रार द्या. त्यानंतर अनेक तक्रारदारांनी तक्रारी केल्या. नंदुरबार शहर पोलीस स्टेशन, नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन आणि आता तालुका पोलीस स्टेशनमध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला आहे.

प्रतिष्ठित व्यक्तींकडून वसुली

खंडणी प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल झाले. आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहादा येथे झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्रतिष्ठित लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तात्काळ आरोपींना अटक केली. शहादा येथे झालेल्या या प्रकारात एक महिला एक तथाकथित पत्रकार आणि एका पोलिसाच्या समावेश होता. नंदुरबार शहर पोलीस स्टेशनात झालेली गुन्ह्यात तीच महिला आणि तोच तथाकथित पत्रकार होता. नंदुरबार उपनगर पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या गुन्ह्यात ती महिला आणि आणखीन दोन नवीन आरोपी होते. मात्र ते आरोपी अजून फरार आहेत. तेवढ्यात तालुका पोलीस स्टेशनमध्ये आणखीन एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. या गुन्ह्यात चक्क एकोणीस वर्षाची तरुणी असल्याने हनी ट्रॅप मध्ये फसवणूक करणारी टोळी ग्रामीण भागातही सक्रिय झाल्याचं समोर आले आहे. त्या संदर्भात नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनला बोराळा गावातील एका तीस वर्षीय शेतकऱ्याने गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.