AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar Police | वडील गेले, मुलगा दिव्यांग; कुटुंब कसं सांभाळणार? नंदुरबार पोलिसांचा मदतीचा हात

आपल्याला एका दिव्यांग व्यक्तीला मदत करायची आहे. त्यावेळी सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने 63 हजार रुपये जमा करत त्याच्या जिद्दीला हातभार लावण्याचे काम पोलिसांनी करून दाखवलं.

Nandurbar Police | वडील गेले, मुलगा दिव्यांग; कुटुंब कसं सांभाळणार? नंदुरबार पोलिसांचा मदतीचा हात
नंदुरबार पोलिसांचा मदतीचा हात Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 3:08 PM
Share

नंदुरबार : पोलीस देखील एक माणूस असतो. याचं वास्तव नंदुरबार जिल्हा पोलीस दलानं दाखवलंय. पोलिसांबद्दलच सर्वसामान्य माणसांच्या मनात फारसे चांगले मत नसते. परंतु नंदुरबार पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी या शब्दाला खोडून काढत एका दिव्यांग युवकाला मदतीचा हात दिला. श्रेयश दिलीप नांदेडकर या व्यक्तीला 63 हजार रुपयांची मदत केली आहे. श्रेयस नांदेडकर (Shreyash Nandedkar) हा युवक दिव्यांग जरी असला तरीदेखील कामाची जिद्द त्याच्यातून दिसून अली आहे. श्रेयश याच्या शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे. तो हात-पाय आणि कमजोर जरी असला तरी मनाने खूप मजबूत आहे. श्रेयश याचे वडील पोलीस मुख्यालयाच्या (Police Headquarters) कॉम्प्लेक्समध्ये झेरॉक्सचे दुकान चालू होते. मात्र काळाचा घाला आणि त्याच्या वडिलांच्या दुर्दैव हृदयविकाराच्या झटक्याने 14 एप्रिल रोजी निधन झालं. त्यामुळं घराची जबाबदारी श्रेयशवर आली. त्यांनी वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाला (Business) हातभार लावत दुकानावर रोज ये-जा करणं सुरू केलं.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हात सरसावले

ही बाब पोलीस अधीक्षक पी आर पाटील त्यांच्या लक्ष गेलं. श्रेयशला आपल्याकडे बोलून घेतलं. श्रेयशला विचारलं. तू काय करशील? श्रेयशनं उत्तर दिलं. काही नाही सर मी लढणार आणि आईला मदत करेन. आईला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही, याची मी जबाबदारी घेणार आहे. हे ऐकून पोलीस अधीक्षक पी आर पाटील हे भावनिक झाले. तातडीने सर्व अधिकाऱ्यांना श्रेयशबद्दल सुचवलं व सांगितलं. आपल्याला एका दिव्यांग व्यक्तीला मदत करायची आहे. त्यावेळी सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने 63 हजार रुपये जमा करत त्याच्या जिद्दीला हातभार लावण्याचे काम पोलिसांनी करून दाखवलं.

परिस्थिती हलाखीची, जिद्द कायम

श्रेयश याची परिस्थिती अत्यंत गरीब आणि हलाखीची आहे. मात्र जिद्द असली तर काही करू शकतो. याच्या उत्तम उदाहरण म्हणजे दिव्यांत श्रेयश नांदेडकर आहे. इम्पॉसिबल इस पॉसिबल, ट्राय ट्राय अगेन. प्रयत्न केला तर सर्व काही मिळू शकतं,  ही म्हण श्रेयश या युवकाला लागू पडते. देशात असे अनेक युवक आहे ज्यांना पोलीस अधीक्षक पी आर पाटीलसारखे देव माणूस मिळत असतील. मात्र ते कधीही पुढे येत नाही. या परिस्थितीत समोर आला आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.