AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार; नारायण राणे गल्लीतील भांडण दिल्लीत नेणार

गेल्या चार दिवसात कोकणात जो काही राडा झाला त्याची माहिती केंद्र सरकारला दिली जाणार आहे. स्वत: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

VIDEO : चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार; नारायण राणे गल्लीतील भांडण दिल्लीत नेणार
narayan rane
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 4:09 PM

सिंधुदुर्ग: गेल्या चार दिवसात कोकणात जो काही राडा झाला त्याची माहिती केंद्र सरकारला दिली जाणार आहे. स्वत: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. चार दिवसात काय काय घडला त्याची संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचं नारायण राणे यांनी आज स्पष्ट केलं.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात काय काय घडलं याची माहिती अमित शहांना देणार आहे. पोलीस कसे वागले, कोर्टात काय झालं आणि पत्रकारांनी कसे कव्हरेज केलं… जे काही अनुभवायला मिळालं त्याची सर्व माहिती अमित शहांना देणार आहे, असं नारायण राणे म्हणाले.

अक्कल आहे म्हणून सत्ता मिळाली

ही सत्ता माझी नाही. भाजपची सत्ता आली आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादाने ही सत्ता आली आहे. माझे कार्यकर्ते आणि नितेश राणेंनी घेतलेली मेहनत. राजन तेली आणि निलेश राणेंनी त्यांना दिलेली साथ या मुळे हा विजय मिळवला. हा विजय मिळवताना अकलेचा वापर झाला. अक्कल ज्याला आहे त्याच्या ताब्यात देवदेतांनी बँक दिली आहे. नितेश आणि निलेशसह कार्यकर्त्यांना हे श्रेय आहे सिंधुदुर्गाचा विजय हा आमच्या देवदेवतांनी मिळवलेला विजय आहे. आता आम्ही महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार आहोत, असं राणे यांनी सांगितलं.

आमचाच खासदार होणार

आता आमचं लक्ष्य महाराष्ट्र सरकार आहे. तिकडे आमची सत्ता नाही. थोडक्यात हुकली. महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांची आणि चांगल्या सत्तेची गरज आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही. अजून अडीच वर्ष आहे विधानसभा निवडणुकीला. तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा आणि खासदार हा भाजचाच असेल. ज्यांचे चेहरे पाहवत नाही अशा लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून आमचा जिल्हा ठेवणार नाही, असा टोला त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना लगावला.

राजनची वर्णी लावणार

गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजन तेलीची आम्ही वर्णी लावणार. आम्ही वाया जावू देणार नाही. आम्ही मविआच्या लोकांना जागा दाखवली आहे, असं सांगतानाच राजन तेलीचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला आहे. तो निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतली तो मान्य असेल. ही काय शिवसेना नाही, असा टोला त्यांनी लगावला.

याला अक्कल म्हणतात

ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते. नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चाललं. माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. कुणाविरोधात? अतिरेक्यांविरोधात? अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात याला अक्कल म्हणतात, असा चिमटा त्यांनी काढला.

संबंधित बातम्या:

Mahadev jankar : काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही, महादेव जानकरांचा आरोप

Sindhudurg Bank Election Result | आता टार्गेट महाराष्ट्र सरकार, विजयानंतर नारायण राणेंची सिंधुदुर्गातून डरकाळी

Narayan Rane: आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार, सिंधुदुर्ग बँकेच्या विजयानंतर नारायण राणेंचं सूचक विधान

एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.