शिर्डी साईबाबा संस्थानच्या CEO पदी भाग्यश्री बानाईत-धिवरे, बगाटेंच्या जागी नियुक्ती

कान्हूराज बगाटे यांची 10 ऑगस्ट 2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली होती. त्यांना सरकारने पदोन्नतीतून आएएस पद दिलं. ते थेट आयएएस अधिकारी नसल्याने त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले होते.

शिर्डी साईबाबा संस्थानच्या CEO पदी भाग्यश्री बानाईत-धिवरे, बगाटेंच्या जागी नियुक्ती
IAS Officer Bhagyashree Banayat Dhiware
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 7:40 AM

अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूरहून भाग्यश्री बानाईत-धिवरे (Bhagyashree Banayat) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बानाईत याआधी रेशीम उद्योग विभागाच्या संचालक होत्या. शिर्डीचे सीईओ कान्हूराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बगाटेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. कान्हूराज बगाटे यांची 10 ऑगस्ट 2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली होती. त्यांना सरकारने पदोन्नतीतून आएएस पद दिलं. ते थेट आयएएस अधिकारी नसल्याने त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले होते. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल करत बगाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या याचिकेत पोलीस प्रशासनाला उच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. कान्हूराज बगाटे यांच्या जागी आता भाग्यश्री बानाईत यांची नेमणूक करण्यात आली आहे, बगाटे मात्र अद्यापही नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोण आहेत भाग्यश्री बानाईत-धिवरे?

भाग्यश्री बानाईत यांचे शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. मोर्शी येथील कॉलेजमधून त्यांनी बीएस्सी पदवी घेतली. आई-वडील दोघंही शिक्षक असल्याने घरी शैक्षणिक वातावरण होतं. त्यामुळे बीएस्सीनंतर त्या बीएड झाल्या. त्यानंतर एक वर्ष त्यांनी एमएससी केलं.

एमपीएससी परीक्षेत सलग निवड होत 2005 मध्ये प्रकल्प अधिकारी, 2006 मध्ये तहसीलदार, तर 2007 मध्ये विक्रीकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पद त्यांना मिळाले. पण या निवडींवर समाधान मानलं नाही.

अखेर 2012 मध्ये त्या भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडल्या गेल्या. त्यावर्षी निवड झालेल्या भाग्यश्री बानाईत-धिवरे या महाराष्ट्र राज्यातील एकमेव महिला अधिकारी ठरल्या होत्या.

पाहा व्हिडीओ :

अकोला मनपा आयुक्तपदी कविता द्विवेदी

दुसरीकडे, अकोला महापालिका आयुक्त पदी पुणे येथील एमसी पीएमआरडीए विभागात कार्यरत असलेल्या कविता द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी शासनाचे आदेश जारी करण्यात आले. बुधवारी जारी झालेल्या आदेशात एकूण आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये कविता द्विवेदी यांची पुणे येथील एमसी पीएमआरडीए विभागातून अकोला मनपा आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.

Akola Kavita Dwiwedi

Kavita Dwiwedi

गेल्या महिन्याभरापूर्वी निघालेल्या आदेशात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची अकोला मनपा आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यानंतर आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांभाळला आता बुधवारी निघालेल्या बदली आदेशात पुणे येथील कविता द्विवेदी यांची अकोला मनपा आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक नियमबाह्य, उच्च न्यायालयानं फटकारलं

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी रुजू, आंचल गोयल यांचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.