Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रब्बीत शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापलं तर महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कपडे काढून मारा, अडचण आली तर फोन करा”

रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले तर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून मारा, त्यावेळी काही अडचण आली तर कधीही फोन करा", असं वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी केलं आहे.

रब्बीत शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापलं तर महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कपडे काढून मारा, अडचण आली तर फोन करा
रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 10:11 AM

अमरावती : रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले तर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून मारा, त्यावेळी काही अडचण आली तर कधीही फोन करा”, असं वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी केलं आहे. अमरावतीमधल्या पत्रकार परिषदेत बोलताना तुपकर चांगलेच आक्रमक झाले होते.

शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा महावितरण कंपनीने सपाटा लावला आहे. आता रब्बी हंगाम सुरू आहे त्यामुळे या रब्बी हंगामात जर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने कापले तर महावितरण कार्यालय जाळण्यास देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असंही रविकांत तुपकर म्हणाले.

महावितरण कर्मचाऱ्यांचे कपडे काढून फटकवाआणि वेळ पडली तर फोन करा

शेतकरी देशोधडीला लागलाय. अस्मानी आणि सुल्तानी संकाटाला सतत बळीराजा सामोरं जातंय. अशावेळी त्याला भक्कम पाठिंब्याची गरज आहे. मात्र संकटाच्या काळातच बळीराजाला अडचणीच आणण्याचं काम होत आहे. आता रब्बी हंगामात सरकार, महावितरण कंपनीला विनंती करा. विनंती करुनही वीज कनेक्शन कापले तर वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारा आणि वेळ पडली तर फोन करा, असं रविकांत तुपकर म्हणाले.

शेतकरी प्रश्नांवर राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने तोडगा काढावा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने केंद्र व राज्य सरकारने मार्ग काढावा, अशी मागणीही तुपकर यांनी केली. परतीच्या पावसामुळं व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मात्र तरी देखील सरकारने शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी मदत केली नाही, त्यामुळे मी आता विदर्भ व मराठवाडाचा दौरा करतोय. 11 नोव्हेंबर पूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर केंद्र व राज्य सरकार विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन 12 नोव्हेंबर नंतर लढा उभारु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

(If the power connection is cut off, take off the clothes of MSEDCL officials Shetkari Sanghatna Ravikant Tupkar Controvercial Statement)

हे ही वाचा :

पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल? करोडो महिलांचा हृदय जिंकणारं राहुल गांधींचं उत्तर

मला वाढदिवसाला हारतुरे, केक, भेटवस्तू नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा, महापौर मोहोळ यांचं पुणेकरांना पत्र

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.