Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रस्त्याच्या कामात गडबड कराल तर…,” नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला असा दम

या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नाही. अन्यथा ठेकेदाराला बोललो तर खाली टाकू अशा शब्दात नितीन गडकरी यांनी दम भरला आहे.

रस्त्याच्या कामात गडबड कराल तर..., नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला असा दम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 10:24 PM

सांगली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे बोलण्यात रोखठोक आहेत. जेकाही कुणाला बोलायचे ते स्पष्टपणे बोलतात. सांगली (Sangli) येथील एका रस्त्याच्या कार्यक्रमात ते स्पष्टचं बोलले. रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर घालू. असा सज्जड दम केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला (Contractor) दिला. सांगलीच्या अष्टा या ठिकाणी पेठ – सांगली रस्त्याच्या चौपदरीकरण भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

सांगली शहराला पुणे-बंगळुरू महामार्गाला जोडणारा पेठ – सांगली रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला. या रस्त्यावर असणारे खड्डे आणि रस्त्याचे झालेलं अर्धवट काम यामुळे वाहनधारक नागरिकांमधून सरकार विरोधात नेहमीच रोष व्यक्त करण्यात येत होता.

रस्ता चौपदरीकरणाचे भूमिपूजन

हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी खासदार, आमदार यांनी पाठपुरावा केला. अखेर केंद्रीय राष्ट्रीय रस्ते विभागाच्या माध्यमातून हा सांगली – पेठ चौपदरीकरण रस्ता करण्यात येत आहे. या रस्ता चौपदरीकरणाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

यांची होती उपस्थिती

या रस्त्याच्या या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. याठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपाचे खासदार संजय पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील आदी उपस्थित होते.

25 वर्षे एकही खड्डा पडणार नाही

या कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता या कामाला एक महिन्यात सुरुवात होईल, असं सांगितलं. त्यानंतर पुढील 25 वर्षे या रस्त्यात एकही खड्डा पडणार नाही. अशा पद्धतीचे काम केलं जाईल, असा विश्वास व्यक्त केला. मी रस्त्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची टक्केवारी घेत नाही.

या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नाही. अन्यथा ठेकेदाराला बोललो तर खाली टाकू अशा शब्दात नितीन गडकरी यांनी दम भरला आहे. त्यामुळं नितीन गडकरी यांच्या स्पष्ट बोलण्याची चर्चा सुरू होती.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.