Chandrapur Murder : आधी आजोबाची हत्या केली, मग मृतदेह अंगणात पुरला; तब्बल 45 दिवसांनी असा झाला घटनेचा उलगडा

आरोपी हा मयत कवडू देटे यांच्या मुलीचा मुलगा असून तो आपल्या आजोबांकडे रहायला आला होता. यावेळी 5 जानेवारी रोजी आजोबा आणि नातवामध्ये काही कारणावरुन वाद झाला. या वादातून नातवाने कुऱ्हाडीच्या दांडक्याने आजोबांच्या डोक्यात वार केले.

Chandrapur Murder : आधी आजोबाची हत्या केली, मग मृतदेह अंगणात पुरला; तब्बल 45 दिवसांनी असा झाला घटनेचा उलगडा
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 9:10 PM

चंद्रपूर : कौटुंबिक वादातून नातवा (Grandson)ने आजोबा(Grandfather)ची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी येथे घडली आहे. सूरज सुधाकर सेलकर (24) असे हत्या करणाऱ्या नातवाचे नाव आहे. तर कवडू देटे असे हत्या झालेल्या आजोबाचे नाव आहे. सूरजने 5 जानेवारी रोजी आपल्या आजोबांची हत्या केली होती. त्यानंतर 45 दिवसांनी आरोपीची आई आणि मयताची मुलगी त्यांना भेटण्यासाठी आली असता सदर हत्येची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयताच्या मुलीने पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर संशयावरुन पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यावेळी त्याने हत्येची कबुली दिली. (In Chandrapur, a grandson killed his grandfather in a family dispute)

अशी घडली हत्या ?

आरोपी हा मयत कवडू देटे यांच्या मुलीचा मुलगा असून तो आपल्या आजोबांकडे रहायला आला होता. यावेळी 5 जानेवारी रोजी आजोबा आणि नातवामध्ये काही कारणावरुन वाद झाला. या वादातून नातवाने कुऱ्हाडीच्या दांडक्याने आजोबांच्या डोक्यात वार केले. या मारहाणीत कवडू देटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर सूरजने त्यांचा मृतदेह अंगणात पुरला.

अशी उघडकीस आली हत्या ?

सूरजची आई आणि मयत कवडू यांची मुलगी हत्येच्या 45 दिवसांनंतर आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आली. मात्र घरी आल्यानंतर तिला वडील कुठेच दिसले नाहीत. तसेच घरामध्ये काही ठिकाणी तिला रक्ताचे डाग दिसले. घरात एक वेगळीच दुर्गंधीही येत होती. तिने आपला मुलगा सूरजला आजोबा कुठे आहेत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे मुलीला शंका लागली. तिने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत वडिल बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख संशयित म्हणून सूरजला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अंगणात पुरलेला मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला.

चंद्रपुरात अन्य एका घटनेत आईने सुपारी देऊन मुलीची हत्या केली

आईने सुपारी देऊन मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी उघडकीस आली आहे. विरूर पोलिसांनी हा खुलासा केला आहे. 18 फेब्रुवारीला एका अज्ञात महिलेचा राजुरा तालुक्यातील कविटपेठ येथे विहिरीत मृतदेह आढळला होता. या परिसरात अज्ञात असलेल्या या महिलेची ओळख पटविण्यासाठी विरूर पोलिसांनी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये तिचे फोटो पाठवले. त्यावरून मयत महिला तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली. पतीपासून विभक्त राहणारी सैदा गर्भवती राहिल्याने तिच्या चारित्र्याबाबत तिच्या आईला शंका होती. त्यामुळे गर्भपात करण्याच्या बहाण्याने तिच्या आईने मुलीला राजुरा तालुक्यातील मुंडीगेट येथील नातेवाईकाकडे पाठवले. 30 हजारांसाठी मुंडीगेट येथील नातेवाईक आणि त्याची पत्नी यांनी विहिरीत ढकलून सैदाची हत्या केली. मात्र पोलिसांनी आरोपींचे कॉल डिटेल्स आणि जबाबातील विसंगतीच्या आधारे खुनाचा उलगडा केला आणि सैदाची आई लचमी, नातेवाईक सीन्नू आणि शारदा यांना अटक केली. (In Chandrapur, a grandson killed his grandfather in a family dispute)

इतर बातम्या

Surat Murder Case: सूरतमध्ये एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीची हत्या, वेबसिरीज पाहून रचला खुनाचा कट

Pune crime | बारामतीतील माळेगाव येथे दिवसा- ढवळ्या घर फोडत ‘इतक्या’ लाखांची रोखड लंपास

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.