तो दारुसाठी ५० रुपये मागत होता, पत्नीने मुलीला त्याचे हात बांधण्यास सांगितले आणि मुसळ हातात घेऊन…

पतीने पत्नीला दारु पिण्यासाठी ५० रुपये मागितले आणि तिचा पारा भडकला. तिने मुलीला बापाचे हात धरण्यास सांगितले. दोन्ही हातात मुसळ घेतला आणि आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर जोर लावून मारला.

तो दारुसाठी ५० रुपये मागत होता, पत्नीने मुलीला त्याचे हात बांधण्यास सांगितले आणि मुसळ हातात घेऊन...
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 7:32 AM

गडचिरोली : घर म्हटलं तर वाद आलाच. भांड्याला भांडा लागतो तसेच पती-पत्नीचे बऱ्याच घरी वाद होतात. या वादात रागाच्या भरात चुकीच्या गोष्टी घडतात. अशीच काहीशी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. पती दारू पित होता. त्यामुळे पत्नी त्याला सुनावत होती. तोही ऐकूण घेत होता. पतीच्या दारू पिण्यामुळे पत्नी त्रासली होती. भांडण झाले की मी तुला मारून टाकून अशी धमकी ती देत होती. ही धमकी खरी ठरेल, असे पतीला कधी वाटले नाही. पण, काल असाच दोघांचाही वाद झाला. पतीने पत्नीला दारु पिण्यासाठी ५० रुपये मागितले आणि तिचा पारा भडकला. तिने मुलीला बापाचे हात धरण्यास सांगितले. दोन्ही हातात मुसळ घेतला आणि आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर जोर लावून मारला. त्यानंतर तो उठलाच नाही.

पन्नास रुपयांसाठी भांडण

गडचिरोली जिल्ह्यातील अति संवेदनशील दुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या असरअली पोलीस स्टेशन अंतर्गत कोर्ला गावात खुनाची घटना घडली. सिरोंचा तालुक्यातील असरअली पोलीस स्टेशन अंतर्गत कोर्ला गावात लस्मय्या पोचम दुर्गम नामक व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत पन्नास रुपयाच्या मागणीतून भांडण सुरू केले. हा वाद एवढा मोठा झाला की वादाला कंटाळून अखेर पत्नीने आपल्या मुलीसोबत पतीची हत्या करून टाकली.

पत्नी राहत होती तणावात

लस्मया दुर्गम हा नेहमीच दारूच्या नशेत पत्नीसोबत भांडण करायचा. नेहमीच होत असलेल्या वादामुळे त्याची पत्नी तणावात राहत होती. पत्नी काल दुपारच्या वेळेस दारूच्या नशेत लस्मया दुर्गम आपल्या घरी आला. पत्नीसोबत भांडण करू लागला. मला दारू पिण्यासाठी अजून पन्नास रुपये दे अशी मागणी करीत होता. या भांडणाने एक मोठ्या वादाच्या रूप घेतले.

मुसळाने डोक्यावर मारले

नेहमीचा राग अनावर झाल्याने महिलेने आपल्या मुलीला बापाचे दोन हात पकडण्यास सांगितले. घरात असलेल्या मुसळाने दोन वेळा डोक्यावर वार केले. तो जागीच ठार झाला. सदर खळबळजनक माहिती गावात पसरली. गावातील काही नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

महिलेसह मुलीलाही अटक

हत्या करणारी पत्नी सुशीला दुर्गम फरार होण्याचे प्रयत्न करताना पोलिसांनी जंगलातून तिला अटक केली. मुलगी रीना दुर्गमलाही पोलिसांनी अटक केली. या दोघांवर 302- 34 भांदवी अंतर्गत गुन्हा दाखल असरअली पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आला. रागावर नियंत्रण न ठेवता एक कुटुंब दारूच्या नशेत उद्ध्वस्त झाले. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूच्या नशेतून हत्या होण्याचे हे प्रकरण कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.