Ichalkaranji Murder : मुलीच्या व आईच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या बापाचा काढला काटा, डोक्यात वार करुन हत्या
शांतिनाथ केटकाळे हे पत्नी आणि तीन मुलींसह बर्गे मळा परिसरात राहत होते. केटकाळे कुटुंबीय शेती व्यवसाय करीत होते. शांतिनाथ यांची पत्नी सुजाता आणि मुलगी साक्षी या दोघींचेही बाहेर प्रेमसंबंध सुरु होते. शांतिनाथ यांना या प्रेम प्रकरणाची माहिती कळल्यानंतर त्यांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते.
इचलकरंजी : अनैतिक संबंधा (Immoral Relationship)त अडथळा ठरणाऱ्या बापाचा मायलेकीने मिळून काटा काढल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री इंचलकरंजीतील बर्गे मळा येथे घडली आहे. शांतिनाथ आण्णाप्पा केटकाळे (40) असे मयत इसमाचे नाव आहे. डोक्यात वार करुन शांतिनाथ यांची हत्या (Murder) करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी मायलेकीला ताब्यात घेतले आहे. साक्षी केटकाळे आणि सुजाता केटकाळे अशी हत्या करणाऱ्या मायलेकीची नावे आहेत. याबाबत पुढील कारवाई पोलिस करीत आहेत. (In Ichalkaranji, a father was killed for obstructing his daughter’s and mother’s immoral relationship)
मायलेकीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला म्हणून हत्या
शांतिनाथ केटकाळे हे पत्नी आणि तीन मुलींसह बर्गे मळा परिसरात राहत होते. केटकाळे कुटुंबीय शेती व्यवसाय करीत होते. शांतिनाथ यांची पत्नी सुजाता आणि मुलगी साक्षी या दोघींचेही बाहेर प्रेमसंबंध सुरु होते. शांतिनाथ यांना या प्रेम प्रकरणाची माहिती कळल्यानंतर त्यांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. शांतिनाथ यांनी मुलगी आणि पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्या ऐकत नव्हत्या. याच कारणावरुन नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास वाद सुरु झाले. यावेळी रागाच्या भरात शांतिनाथ यांनी दोघींना मारहाण देखील केली. त्यामुळे वाद इतका टोकाला गेला की मुलगी साक्षीने लोखंडी गज आणि बॅटने वडिलांच्या डोक्यात जोरदार वार केला. या मारहाणीत शांतिनाथ यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि घरामध्ये रक्ताचा सडा पडला.
आरोपी मायलेकीला पोलिसांनी ताब्यात घेतले
घटना पाहून शांतिनाथ यांच्या दोघी लहान मुलींनी आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले. त्यांनी तात्काळ शांतिनाथ यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शांतिनाथ यांचे भाऊ महावीर केटकाळे यांच्या फिर्यादीवरुन हत्येच्या घटनेची नोंद करीत पोलिसांनी आरोपी मायलेकींना ताब्यात घेतले. तसेच शांतिनाथ यांच्या इतर दोन मुलींना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे. शांतिनाथ यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारे पोलिसांनी घटनास्थळावरुन हस्तगत केली आहेत. याप्रकरणी अधिक तपास शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे करत आहेत. (In Ichalkaranji, a father was killed for obstructing his daughter’s and mother’s immoral relationship)
इतर बातम्या
नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस, मनमाडला दुकाने फोडली, घरात घुसून ऐवज लंपास, मंगळसूत्रही ओरबाडले
रस्त्याच्या कडेला रिक्षा लावली आणि… बदलापुरात तरुण रिक्षा चालकाची आत्महत्या