CCTV Video : कोल्हापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला, कार पेटवली; घटना सीसीटीव्हीत कैद
सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई हे परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करत होते. यामुळेच अवैध धंदेवाल्यांचा त्यांच्यावर राग होता. याच रागातून दोन दिवसांपूर्वी देसाई यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर शिंगणापूरमधील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील देसाई यांच्या कार्यकर्त्याच्या घरावर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.
कोल्हापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून घरावर हल्ला करत कार पेटवलीImage Credit source: TV9
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी सामाजित कार्यकर्त्या (Social Worker)च्या घरावर हल्ला (Attack) करत कारची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. आधी कारची तोडफोड केली, मग कार पेटवून दिली. तब्बल अर्धा तास हल्लेखोरांनी धुडगूस घातला होता. ही सर्व घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अशा प्रकारे हल्ला करण्याची गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. फुलेवाडी रिंग रोड परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांच्या घरावर दोन दिवसांपूर्वा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई हे परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करत होते. यामुळेच अवैध धंदेवाल्यांचा त्यांच्यावर राग होता. याच रागातून दोन दिवसांपूर्वी देसाई यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर शिंगणापूरमधील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील देसाई यांच्या कार्यकर्त्याच्या घरावर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी देसाई यांच्या कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या कारचीही तोडफोड केली. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी कारही पेटवून दिली. मध्यरात्री तब्बल अर्धा तास हल्लेखोरांनी धूडगूस घातला होता. हल्लेखोर कार पेटवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी या घटना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. (In Kolhapur a social workers car was set on fire out of prejudice, Incident caught in CCTV)