Vasai Murder : वसईत मित्राकडून मैत्रिणीची हॉटेलमध्ये धारदार हत्याराने वार करुन हत्या

सोमवारी सकाळी हॉटेलमधील वेटरने रुमचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. वेटरने ही बाब हॉटेलच्या मॅनेजरच्या निदर्शनास आणून दिली. मॅनेजर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यानंतर रुमचा दरवाजा खोलला असता आत तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.

Vasai Murder : वसईत मित्राकडून मैत्रिणीची हॉटेलमध्ये धारदार हत्याराने वार करुन हत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 9:21 PM

वसई : अज्ञात कारणावरुन मित्राने आपल्या मैत्रिणीची धारदार हत्याराने वार (Attack) करुन निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना आज वसईत उघडकीस आली आहे. हत्येनंतर आरोपी (Accused) घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याबाबत वसई पोलिसात हत्येच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सायली सहासने असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सागर नाईक असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दोघेही वसईतील एव्हरशाईन परिसरातील रहिवासी आहेत. दरम्यान फरार आरोपीचा वसई पोलिस शोध घेत आहेत. (In Vasai, a friend was stabbed to death in a hotel by a friend)

धारदार शस्त्राने वार करुन तरुणीची हत्या

सायली आणि सागर या दोघांनी रविवारी स्टेटस हॉटेलमध्ये ऑनलाईन बुकिंग केले होते. त्यानंतर ते दोघेही हॉटेलच्या रुममध्ये दाखल झाले. सायंकाळी 6 च्या सुमारास सागर हॉटेलमधून बाहेर पडला तो परतलाच नाही. सोमवारी सकाळी हॉटेलमधील वेटरने रुमचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. वेटरने ही बाब हॉटेलच्या मॅनेजरच्या निदर्शनास आणून दिली. मॅनेजर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यानंतर रुमचा दरवाजा खोलला असता आत तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तरुणीच्या डोक्यावर, मानेवर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

भंडाऱ्यात चोरट्याकडून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला

भंडाऱ्यात चोरीचा डाव फसल्याने चोरट्याकडून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे. गंभीर जखमी पत्नीवर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुरलीधर नत्थू किरणापुरे आणि सिंधु मुरलीधर किरणापुरे अशी पती-पत्नीची नावे आहेत. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आरोपीचा शोध घेत आहेत. किरणापुरे यांची मुले क्रिकेट पाहण्यासाठी गेले होते. यामुळे किरणापुरे मुलांसाठी दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने हात साफ करण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्येच किरणापुरे दाम्पत्याला जाग आल्याने चोरट्याचा डाव फसला आणि पकडले जाऊ या भीतीने त्याने पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. (In Vasai, a friend was stabbed to death in a hotel by a friend)

इतर बातम्या

Bhandara Murder : चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येताच चोरट्याने केले पती-पत्नीवर चाकूने वार, पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

Kurla Balcony Collapsed : कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.