AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय नौदलातील साताऱ्याच्या सुपुत्राचं धाडसी कर्तुत्व, तुफान चक्रीवादळाचा सामना करत 186 मच्छिमारांना वाचवलं

तौक्ते चक्रीवादळात सातारच्या सुपुत्राने महत्वपूर्ण कामगिरी केली. पाटण तालुक्यातील सणबुरच्या या सुपुत्राचं नाव शिवम जाधव असं आहे.

भारतीय नौदलातील साताऱ्याच्या सुपुत्राचं धाडसी कर्तुत्व, तुफान चक्रीवादळाचा सामना करत 186 मच्छिमारांना वाचवलं
| Updated on: May 22, 2021 | 1:28 AM
Share

सातारा : तौक्ते चक्रीवादळात सातारच्या सुपुत्राने महत्वपूर्ण कामगिरी केली. पाटण तालुक्यातील सणबुरच्या या सुपुत्राचं नाव शिवम जाधव असं आहे. ते भारतीय नौदलात लेफ्टनंट पायलट पदावर आहेत. त्यांनी नौदलातील आपल्या सहकाऱ्यांसोबत तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 186 मच्छिमारांचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या शौर्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवमच्या कामगिरीची सणबुर ग्रामस्थांना माहिती मिळताच गावकऱ्यांचे उर अभिमानाने भरुन आले आहेत. त्यांनी शिवमसह त्याच्या आई वडीलांचंही जोरदार कौतुक केलं (Indian Navy officer from Satara Shivam Jadhav save life of 186 fishermans in cyclone awarded).

तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या 186 मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात लेफ्टनंट पायलट शिवम विठ्ठल जाधव आणि त्यांच्या नौदलातील सहकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका होती. म्हणूनच याची दखल नौदल प्रमुखांपासून संरक्षण मंत्र्यांपर्यंत सर्वांनी घेतली. यामुळे सातारा जिल्ह्याच्या शौर्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

ताशी 120 ते 140 वेगाने वाहणाऱ्या चक्रीवादळाचा सामना करत मदतकार्य

तौक्ते वादळ मुंबई येथे धडकताच ताशी 120 ते 140 वेगाने वारे वाहत होते. वादळामुळे समुद्रातील जहाजे व मच्छिमारांच्या नौका उलटल्या. मंगळवारी (18 मे) सायंकाळी चक्रीवादळामुळे मुंबई येथील अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक मच्छीमार भयानक वादळात अडकून पडले. काही जहाजावरील कर्मचारी भरकटल्याची खबर मुंबई येथील भारतीय नौदल अधिकार्‍यांना मिळाली. याच वेळी नौदलाचे लेफ्टनंट पायलट शिवम जाधव यांनी आपल्या नौदलातील सहकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

वादळात अडकलेल्या 186 मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढ

रात्रीची वेळ असल्याने अंधाराचा सामना करीत त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून मदतकार्य केले. आयएनएस कोलकाता (INS Kolkata) या लढावु युद्ध नौकेवर लेफ्टनंट पायलट शिवम जाधव यांच्यासह तैनात असणाऱ्या जवानांनी प्राणाची तमा न बाळगता, येईल त्या प्रसंगाला तोंड दिलं. विद्ध्वंसकारी चक्रीवादळाचा सामना करत त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यावेळी वादळात अडकलेल्या 186 मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. या कामात जहाजावरील पायलट शिवम जाधव यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या कामगिरीचे नौदल प्रमुखांनी व संरक्षणमंत्री यांनी कौतुक केले. या कामगिरीची ग्रामस्थांना माहिती मिळताच शिवम जाधव यांच्यासोबत त्यांचे वडील विठ्ठल जाधव आणि आई संगिता जाधव यांचंही कौतुक करण्यात आलं.

“आम्हाला शिवमचा अभिमान, अशीच देशसेवा करत राहो”, शिवमच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

शिवमने सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच एनडीए करण्याचे स्वप्न बाळगले. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीने यश प्राप्त केले. नौदलात लेफ्टनंट पायलट पदावर काम करताना त्याने धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. देशसेवा करताना अशीच चांगली कामगिरी त्याने करावी ही सदिच्छा,” अशी प्रतिक्रिया शिवमचे वडील विठ्ठल जाधव आणि आई संगिता जाधव यांनी दिली.

हेही वाचा :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कौकण दौरा पूर्ण, शेती, वीज, मस्त्य व्यवसायासह कोव्हिड स्थितीचा आढावा, कोणाचे किती नुकसान?

हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे?”

व्हिडीओ पाहा :

Indian Navy officer from Satara Shivam Jadhav save life of 186 fishermans in cyclone awarded

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.