मांजरा धरणात इतकं पाणी का सोडलं, चौकशी करा : देवेंद्र फडणवीस
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहणीचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. त्यांनी आज लातूरमधून आजच्या दौऱ्याला सुरुवात केली. लातूर जिल्ह्यातील भुसणी गावात जाऊन त्यांनी पाहणी केली. या दौऱ्यानंतर उस्मानाबादमध्ये या दौऱ्याचा समारोप होणार आहे.
लातूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहणीचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. त्यांनी आज लातूरमधून आजच्या दौऱ्याला सुरुवात केली. लातूर जिल्ह्यातील भुसणी गावात जाऊन त्यांनी पाहणी केली. या दौऱ्यानंतर उस्मानाबादमध्ये या दौऱ्याचा समारोप होणार आहे.
दरम्यान, लातूरमधील पाहणीदरम्यान माध्यमांनी फडणवीसांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मांजरा धरणात इतके पाणी का सोडले याची चौकशी झाली पाहिजे. शिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात दसऱ्या आधी थेट रक्कम सरकारने दिली पाहिजे”.
संजय राऊतांवर निशाणा
जी लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू समजणार नाहीत. एसीत बसून अग्रलेख लिहून मोठे लिडर झाले, त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा काय समजणार, असा हल्लाबोल देवेंद्र फडवणीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केला.
पालकमंत्र्यांनीही दौरा केला नाही
मुख्यमंत्री तर सोडाच, पण अनेक पालकमंत्र्यांनीही नुकसानीचा पाहणी दौरा केला नाही. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दौरा केला पाहिजे. हे सरकार विदर्भ-मराठवाडा विरोधी सरकार आहे. पीकविमा सरकारची जबाबदारी आहे. कंपनीवर दबाव वाढवत शेतकऱ्यांना सरकारनेच दिलासा दिला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान अशावेळी तुम्ही सत्तेत नाही याची खंत वाटते का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, आम्हाला खंत वाटते, पण आम्ही मात्र विरोधीपक्षाची भूमिका चोख बजावू”
‘दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत द्या’
दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मांजरा धरणारे दरवाजे योग्य पद्धतीनं उघडले गेले होते का? असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. आम्ही केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत केली होती. राज्य सरकारनं आही मदत द्यावी त्यानंतर केंद्राकडून पैसे घ्यावेत, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश – फडणवीस
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. तो सरकारनं समजून घ्यावा. सरकार जर तातडीने मदत करणार नसेल तर आमचे एक आमदार कोर्टात गेले आहेत. आम्हाला अंगावर तर जावंच लागेल ना, असा संतापही फडणवीसांनी व्यक्त केलाय. जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. जलयुक्तबद्दल राजकीय भाष्य नको. ज्यांनी दिलं ते कुणाच्या दबावाखाली दिले ते बघावं लागेल, असंही फडणवीस म्हणाले.
VIDEO : देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
संबंधित बातम्या
आमच्या काळात जे विमा कंपन्यांचे ऑफिस फोडत होते ते आता सत्तेत, फडणवीसांची ठाकरेंवर टीका