असं झालं की, मंत्रिमंडळ विस्तार होतो, अब्दुल सत्तार यांनी सांगितलं

मला वैयक्तिक असं वाटते की शिवाजी महाराजांचा फोटो हा नोटांवर असला पाहिजे.

असं झालं की, मंत्रिमंडळ विस्तार होतो, अब्दुल सत्तार यांनी सांगितलं
अब्दुल सत्तार यांनी सांगितलंImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 6:09 AM

परभणी : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार यावर चर्चा होतेय. यासंदर्भात कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ज्या क्षणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोन येईल त्याच क्षणी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मी चार वेळा मंत्री झालेलो आहे. मुख्यमंत्र्यांचा फोन आला की मंत्रिमंडळ विस्तार होतो. अब्दुल सत्तार यांनी परभणीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अब्दुल सत्तार आज परभणीत होते. शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.

या सरकारमध्ये सगळं वेल अँड गुड आहे. मोठा परिवार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टी होत असतात. त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सरकारला अजिबात धोका नाही. शिवाय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. पुढचे दोन वर्षे हेच मुख्यमंत्री राहतील. माझी तर इच्छा आहे की पुढेही हेच मुख्यमंत्री असावेत, असंही सत्तार म्हणाले.

शिवाजी महाराज प्रत्येक मराठी माणसासाठी दैवत आहे. मला वैयक्तिक असं वाटते की शिवाजी महाराजांचा फोटो हा नोटांवर असला पाहिजे. माझ्या हातात हे जर राहिलं असतं तर मी लगेच ऑर्डर काढली असती, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

सचिन सावंत यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी करू नये. या छोट्या-मोठ्या गोष्टी चालत राहतात. मजाकमध्ये म्हणलेली गोष्ट आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांना मी वैयक्तिक पाहिलेला आहे. त्यांचं काम उत्तम आहे. काही लोकांना कामच राहिलं नाही. त्यामुळं ते अशा गोष्टी समोर आणतात.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे यांनी अब्दुल सत्तार यांचं मंत्रीपद काढून त्यांना बिन खात्याचे मंत्री करावं, असं म्हटलं. यावर अमोल काय एवढा मोठा नाही की आपण इतक्या लोकांत त्याची चर्चा करावी. कोणाला टीव्हीवर येण्यासाठी काही बोलावे लागते, त्याचाच हा एक भाग आहे. राहिला विषय अमोल याच्याबद्दल काय बोलायचं हे मला माहीत आहे. मात्र हे बोलणं उचित होणार नाही. नाहीतर मला कोणाचं काय करायचं हे चांगलं माहीत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.