जळगावच्या विलास पाटलांची कमाल, दोन्ही पत्नी बनल्या ग्रामपंचायतीच्या मेंबर, बलाढ्य विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम

"दोन बायका आणि फजिती ऐका" अशी म्हण म्हटली जात असली तरी या म्हणीच्या बरोबर विरुद्ध स्थिती जळगावात पाहायला मिळाली आहे.

जळगावच्या विलास पाटलांची कमाल, दोन्ही पत्नी बनल्या ग्रामपंचायतीच्या मेंबर, बलाढ्य विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम
विलास पाटील आणि त्यांच्या पत्नी ममता पाटील, संध्या पाटील
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 3:39 PM

जळगाव: “दोन बायका आणि फजिती ऐका” अशी म्हण म्हटली जात असली तरी या म्हणीच्या बरोबर विरुद्ध स्थिती जळगावात पाहायला मिळाली आहे. पाचोरा तालुक्यातील पहाण या गावातील विलास पाटील यांनी त्यांच्या दोन्ही पत्नींना ग्रामपंचायतीचं सदस्य बनवलं आहे. एका पत्नीला सार्वत्रिक निवडणुकीत तर दुसऱ्या पत्नीला पोटनिवडणुकीत विजयी करण्यात विलास पाटील यांना यश आलं आहे. विलास पाटील यांच्या करिष्म्याची चर्चा जळगावात सुरु आहे.

दोन्ही पत्नी ग्रामपंचायतीच्या मेंबर

पाचोरा तालुक्यातील पहाण ग्रामपंचायत गावातील एका माणसानं जणू काही स्वप्नचं सत्यात उतरवलं आहे. पहार गावातल्या एका पतीने आपल्या पहिल्या पत्नीला सार्वत्रिक निवडणुकीतून ग्रामपंचायत सदस्य केलं. काही काळानंतर एका ग्रामंपचायत सदस्याचं निधन झालं. त्यानंतर पोटनिवडणुकीची आलेली संधी पाहता एका बलाढ्य विरोधका समोर आपल्या दुसऱ्या पत्नीला उमेदवारी दिली. विलास पाटील आणि त्यांच्या पत्नींनी कार्यकर्त्यांसह कष्ट करत विजय मिळवला.

वर्षभरात दुसऱ्या पत्नीला संधी

पहाण तालुका पाचोरा येथील ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये पूनम ज्ञानेश्वर पाटील या सदस्याचे आकस्मित निधन झाले होते. त्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. विलास पाटील यांच्या पत्नी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या होत्या. त्यांच्यासमोर बलाढ्य उमेदवार होता. विलास पाटील यांची दुसरी पत्नी संध्या विलास पाटील यांनी 2020-21 च्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून वार्ड क्रमांक 3 मधून 183 मते घेऊन विजय मिळवला होता. तर, विरोधकाला फक्त 63 मते मिळाली होती.

9 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सदस्यापैकी पुनम पाटील यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्या जागेवर पोटनिवडणूक लागली. विलास पाटील यांनी त्या जागी पुन्हा पहिली पत्नी ममता पाटील यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरवले. विरोधक बलाढ्य असताना विलास पाटील हे भूमीहीन असूनही त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही पत्नींना विजय मिळवून दिला. विलास सुभाष पाटील हे पहाण या गावातील शिवसेना शाखाप्रमुख आहेत त्यांच्या दोन्ही पत्नी ग्रामपंचायत सदस्य झाल्याने गाव परिसरात रंगतदार चर्चेला उधाण आले आहे. पहिली पत्नी ममता पाटील या पोटनिवडणुकीत सर्वसाधारण स्त्री या आरक्षणातून निवडून आले आहेत. तर दुसरी पत्नी संध्या पाटील या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती मधून निवडणूक लढवली होती. विलास पाटील यांनी निवडणुकीसाठी माजी सरपंच भगवान पाटील, एकनाथ अहिरे,माजी उपसरपंच उमाकांत पाटील, राजेंद्र पाटील व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.

इतर बातम्या:

Nagpur Corona | वडिलांचा कोरोनामुळं ऑक्सिजनअभावी मृत्यू, मुलांनी जयंतीदिनी घालून दिला नवा आदर्श!

#Hruteek | ‘दिल मिल गये….’, पार पडला ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचा साखरपुडा, पाहा फोटो!

Jalgaon Pachora Vilas Patils two wife elected as Member of Pahan Gram Panchayat

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.