Video | मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली, रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव, व्हिडीओ व्हायरल

आज झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील पुलावरुन पाणी जात होते. यावेळी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाला. मृत तरुणासोबत त्याचा भाऊसुद्धा होता.

Video | मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली, रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव, व्हिडीओ व्हायरल
JALNA YOUNG BOY DIED
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 11:11 PM

जालना : भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावात पुलावरून जाताना एक तरुण पाण्यात वाहून गेला आहे. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात असलेल्या नदीच्या पुलावरुन पाणी जात होते. यावेळी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाला. मृत तरुणासोबत त्याचा भाऊसुद्धा होता. मात्र, दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. मृत तरुणाचे नाव शाहेद सलीम असे आहे. (Jalna Bhokardan young man swept away in flood water of river while crossing bridge)

नेमका काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडतोय. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी या गावात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. या गावाजवळून एक नदी वाहते. या नदीला भरपूर पाणी आले. पाण्याचा ओघ जास्त असल्यामुळे या नदीवर असलेल्या पुलावरुन पाणी वाहत होते. यावेळी अवघडराव सावंगी या गावातील शाहेद सलीम आणि त्याचा भाऊ या दोन तरुणांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला.

तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मात्र, हा प्रयत्न करताना शाहेद सलीम पाण्याच्या प्रवाहामध्ये स्वत:ला सावरु शकला नाही. परिणामी तो पाण्यात वाहून गेला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नशीच बलवत्तर म्हणून शाहेद सलीम याचा दुसरा भाऊ या अपघातातून वाचला. तो सध्या सुखरप आहे.

पाहा व्हिडीओ :

मराठवाड्यात ठिकठिकाणी पाऊस

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राज्यात ठिकाठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. औरंगाबाद जालना अशा जिल्ह्यात तर पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड तसेच पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 9 जून रोजी मुसळधार पाऊस झाला. या पासामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जुई नदीला तुफान पूर आला होता. नदीला आलेल्या या पुरात चक्क पूल वाहून गेल्याची घटना घडली होती. पूलच वाहून गेल्यामुळे औरंगाबाद-जळगाव महामार्ग ठप्प झाला होता. नंतर पाणी ओसरल्यानंतर काही वेळाने येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

इतर बातम्या :

फिरायला जाताय? मग पर्यटन राजधानी तुमच्यासाठी खुली!, कोणती पर्यटनस्थळं सुरु?

कोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज

संभाजी छत्रपतींच्या मोर्चात आंबेडकर म्हणजे महाराष्ट्रात नव्या राजकीय आघाडीची मुहूर्तमेढ? वाचा 7 मोठे मुद्दे

(Jalna Bhokardan young man swept away in flood water of river while crossing bridge)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.