दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी 6 टीएमसी पाणी देण्याचे आदेश, जलसंपदामंत्री जयंत पाटलांकडून निर्णयांचा धडका

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका मागोमाग एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा धडका सुरू केलाय. आज (12 ऑगस्ट) त्यांनी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी 6 टीएमसी पाणी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी 6 टीएमसी पाणी देण्याचे आदेश, जलसंपदामंत्री जयंत पाटलांकडून निर्णयांचा धडका
जयंत पाटील, जलसंपदामंत्री
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 3:00 PM

मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका मागोमाग एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा धडका सुरू केलाय. आज (12 ऑगस्ट) त्यांनी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी 6 टीएमसी पाणी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयामुळे राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण होईल, असं मत त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त केलं जातंय. या निर्णयानुसार वारणा प्रकल्पाच्या मंजूर बिगर सिंचन तरतूदीतील विनावापर 6 टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त जत तालुक्याला मिळेल.

जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास बिगर संचिन तरतूदीतील विनावापर 6 टीएमसी पाणी जत तालुक्याला देण्याचे आदेश दिलेत. याबाबत स्वतः जयंत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली. गेली अनेक वर्षे जत तालुक्याची ओळख सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून आहे. या जत तालुक्यातील 65 गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती.

विस्तारीत म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा

आताच्या एकूण 6 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयानं जत तालुक्यातील पाणी प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे अनेक गावांमधील जमीन सिंचनाखाली येईल. जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास हे पाणी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या गावांना पाणी द्यावे, अशी मागणी होती. त्याअनुषंगाने आज हा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयामुळे विस्तारीत म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

“राजारामबापू पाटील यांचं स्वप्न पूर्ण, सांगली जिल्हावासीयांना मोठा आनंद”

जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न राजारामबापू पाटील यांनीही पाहिले होते. तेच स्वप्न या निमित्ताने पूर्ण होत आहे. याचा मला व सांगली जिल्हावासीयांना मोठा आनंद आहे, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

पेगाससद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, लोकशाही वाचवण्यासाठी देश एकवटल्याशिवाय राहणार नाही: जयंत पाटील

तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात, जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटके शुभेच्छा

Photo : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी

व्हिडीओ पाहा :

Jayant Patil declared decision of granting 6 TMC water to Jat Taluka

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.