Sangli Boy Death : सांगलीत दगड घडवणाऱ्या मजुराच्या मुलाला जेसीबीने चिरडले, रस्त्याशेजारी झोपला होता शाळकरी मुलगा

या अपघातात हर्षवर्धनच्या डोकं फुटले आणि डोक्याची अर्धी कवटी घटनास्थळाहून गायब असल्याची बाब निदर्शनास आली. तर हर्षवर्धनच्या आजूबाजूला झोपणारे दोघे जण मात्र सुरक्षित आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यामुळे या घटनेमुळे उलट-सुलट चर्चा सुरू होती.

Sangli Boy Death : सांगलीत दगड घडवणाऱ्या मजुराच्या मुलाला जेसीबीने चिरडले, रस्त्याशेजारी झोपला होता शाळकरी मुलगा
सांगलीत दगड घडवणाऱ्या मजुराच्या मुलाला जेसीबीने चिरडले
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 9:52 PM

सांगली : सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अंत्यत दुर्देवी घटना घडली आहे. रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या मुलाला जेसीबीने चिरडल्याचे दुर्दैवी घटना सांगलीत घडली आहे. डोक्यावरून जेसीबी (JCB) गेल्याने दगड घडवणाऱ्या मजुरा (Worker)च्या मुलाचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. सुरुवातीला या घटनेबाबत घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र इस्लामपूर पोलिसांनी तातडीने तपास केल्याने जेसीबीच्या अपघातामध्ये ही घटना घडल्याचे निष्पन्न झाल्याने चालकाला अटक केली आहे. हर्षवर्धन नागनाथ पाथरवट (13) असे मयत शाळकरी मुलाचे नाव आहे. (JCB crushes the son of a stone maker in Sangli, accuse arrested)

जेसीबी मागे घेताना मुलाला चिरडले

सांगलीच्या इस्लामपूर या ठिकाणी असणाऱ्या वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर अभियंता नगरमध्ये कृषी महाविद्यालयाच्या कुंपणाचे काम सुरू आहे. तेथे भिंतीलगत पाथरवट समाजाचे नागरिक गेली अनेक वर्षे दगड घडवण्याचे काम करत असतात. या दगड काम करणाऱ्यांपैकी तिघेजण रात्री रस्त्यावर झोपले होते. झोपलेल्या स्थितीमध्ये आज सकाळी एका मुलाचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ माजली होती. या अपघातात हर्षवर्धनच्या डोकं फुटले आणि डोक्याची अर्धी कवटी घटनास्थळाहून गायब असल्याची बाब निदर्शनास आली. तर हर्षवर्धनच्या आजूबाजूला झोपणारे दोघे जण मात्र सुरक्षित आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यामुळे या घटनेमुळे उलट-सुलट चर्चा सुरू होती.

जेसीबी मालकाला पोलिसांकडून अटक

या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला. या रस्त्याशेजारी तीन मुले झोपली होती. याप्रकरणी या रस्त्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या एका जेसीबी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जेसीबी मागे घेत असताना हा अपघात घडला आणि यानंतर त्या ठिकाणाहून आपण घाबरून पळून गेल्याचा चालकाने सांगितले. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. (JCB crushes the son of a stone maker in Sangli, accuse arrested)

इतर बातम्या

Thane Youth Murder : मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या भांडणात एका तरुणाची हत्या, तीन आरोपी अटक तर दोघे फरार

Parbhani Murder : परभणीत अज्ञात कारणावरुन वृद्ध दाम्पत्याची हत्या, एक महिला गंभीर जखमी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.