करुणा शर्मा यांना दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी वाढला
करुणा शर्मा (Karuna Sharma) यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. कारण त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता येत्या सोमवारी म्हणजे 20 सप्टेंबरला जामीनावर सुनावणी होणार आहे,
बीड : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. कारण त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता येत्या सोमवारी म्हणजे 20 सप्टेंबरला जामीनावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे अजून दोन दिवस तरी त्यांना कोठडीतच काढावे लागणार आहेत. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती.
करुणा शर्मांचा मुक्काम वाढला
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी बीडच्या परळीत आलेल्या आणि त्या नंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जमिनीवरील निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे.
करुणा शर्मांना 5 सप्टेंबरला झाली होती अटक
न्यायाधीश सापटनेकर यांच्यासमोर आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला असून न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे. शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केल्याचा आरोपाखाली करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सोमवारी सुनावणी
त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज न्या. सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अँड. भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतिने सरकारी वकिल अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
नेमकं काय घडलं?
शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.
व्हायरल व्हिडीओत काय?
दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
शर्मांची तक्रार
परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, अशी तक्रार शर्मा यांनी परळी शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर जमावाने त्यांची गाडी रोखली होती. काही क्षण ही गाडी थांबल्यानंतर त्या परत निघून गेल्या होत्या.
संबंधित बातम्या