गडचिरोलीतील लेडी ड्रायव्हरची उच्च शिक्षणासाठी इंग्लंड भरारी, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने इतक्या लाखांची शिष्यवृत्ती

किरण कुरमावार हिला उच्च शिक्षणासाठी समाज कल्याण विभागाने ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने ती इंग्लंडमधील प्रसिद्ध अशा लीड्स विद्यापीठात ‘इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे.

गडचिरोलीतील लेडी ड्रायव्हरची उच्च शिक्षणासाठी इंग्लंड भरारी, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने इतक्या लाखांची शिष्यवृत्ती
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 10:22 PM

गडचिरोली : जिल्ह्यातील रेगुंठा येथील लेडी ड्रायव्हर किरण कुरमावर हिचे विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने किरणला ४० लाखांची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात इंग्लंड येथील लीड्स विद्यापीठात किरण प्रवेश घेणार आहे. राज्याच्या एका टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा ते सिरोंचापर्यंत ‘टॅक्सी’ चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या किरण कुरमावार हिला उच्च शिक्षणासाठी समाज कल्याण विभागाने ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने ती इंग्लंडमधील प्रसिद्ध अशा लीड्स विद्यापीठात ‘इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे.

रेगुंठा ते सिरोंचा दरम्यान चालवले प्रवासी वाहन

किरण हिने तेलंगणा राज्यातील हैदराबाद उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी काही काळ रेगुंठा ते सिरोंचा दरम्यान प्रवासी वाहन चालवण्यास सुरुवात केली. पुढे हा व्यवसाय वाढवून तिने तीन प्रवासी वाहन खरेदी केले. पण विदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. यासाठी तिने वर्षभरापासून प्रयत्न चालविले होते. यात तिला इंग्लंड येथील प्रसिद्ध अशा लीड्स विद्यापीठात प्रवेश मिळाला. परंतु यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ तिच्याकडे नव्हते.

KIRAN 2 N

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला पुढाकार

माध्यमांनी हा विषय लाऊन धरल्यानंतर काहींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवले. शिंदेंनी देखील तत्परता दाखवत संबंधितांना तसे निर्देश दिले. यामुळे लवकरच किरणला ४० लाखांची शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. मनात जिद्द असल्यास गडचिरोली जिल्ह्यातील रेंगुंठा सारख्या दुर्गम भागातील मुलगी देखील विदेशात शिक्षण घेऊ शकते. हे किरणने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. किरणच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.