शिवसेना-भाजपची युती कोकणातून सुरू झाली? विनायक राऊत म्हणाले, माझे मित्र नितेशजी राणे! नेमकं काय घडलं ते वाचा?

कोकण आणि या कोकणातील राजकीय राडे आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण जरा थांब आणि हे पहा. नितेश राणे आणि विनायक राऊत यांच्यातील हितगुज पाहा.

शिवसेना-भाजपची युती कोकणातून सुरू झाली? विनायक राऊत म्हणाले, माझे मित्र नितेशजी राणे! नेमकं काय घडलं ते वाचा?
nitesh rane and vinayak raut
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 12:17 AM

सिंधुदुर्ग : कोकण आणि या कोकणातील राजकीय राडे आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण जरा थांब आणि हे पहा. नितेश राणे आणि विनायक राऊत यांच्यातील हितगुज पाहा. टीका करण्याची कोणतीही संधी न सोडणाऱ्या शिवसेना आणि राणेंमध्ये मनोमिलन पाहायला मिळालंय. निमित्त होतं वेंगुर्ल्यातील सागररत्न मत्य बाजारपेठेच्या लोकार्पणाचं. त्यामुळे नितेश राणेंनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवलीय का? मंत्रिपद मिळाल्यानंतर राणे कुटुंबियांमध्ये नरमाई आलीय का? कोकणात शिवसेना-भाजप नेत्यांचे ‘मनोमिलन’ झालेय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरीलच हा खास रिपोर्ट (Know what happened in Vengurla between Rane and Shivsena about alliance).

वेंगुर्ल्यातील लोकार्पणाच्या कार्यक्रमात केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या नारायण राणेंनी विकासासाठी एकत्र येण्याचा सल्ला दिलाय. नांदा सौख्य भरे असे सांगत एक वेगळा राजकीय संदेश त्यांनी कोकणातून दिलाय. शिवसेना आणि राणे यांच्यातील राजकीय वैर आपण नेहमी पाहिलं. मात्र यावेळी चित्र उलट होतं. आज पाहिलेल्या या दृश्यांमुळे यूतीची चर्चा पुन्हा रंगलीय. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करु, असं म्हणत नितेश राणेंनी जणू राजकीय संकेतच दिलेत.

“विनायक राऊतांनी नितेश राणेंची पाठ थोपटली”

नितेश राणे आपलं भाषण संपवून खुर्चीवर वीराजमान होत नाही, तोवर शिवसेना खासदार विनायक राऊतांनी त्यांची पाठ थोपटलीय. नितेश राणेंनी बोलून दाखवलेली एकत्र येण्याची भाषा संपत नाही. तोपर्यंत विनायक राऊतांनी देखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावर केलाय. आपण आणि नितेश राणे मित्र असून अभिनंदन करायला सुद्धा मोठं मन लागतं, असं म्हणत विनायक राऊतांनी कोकणातले राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्र येतात याची झलक दाखवलीय.

शिवसेना राणे एकत्र येणं वेगळ्या राजकारणाची नांदी?

सेना आणि राणेंचं राजकारणात पटत नाही. हे आतापर्यंत आपण पाहत आलोय. मात्र राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्याच मोठ्या कार्यक्रमात सेना आणि भाजप किंबहुना राणे एकत्र आलेत. शिवसेना राणे एकत्र येणं वेगळ्या राजकारणाची नांदी तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. मिळते-जुळते घेण्याच्या या संकेतामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्यात.

राणेंची शिवसेनेबाबत नरमाई का?

नितेश राणेंनी कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही जुळवून घेण्याचं वक्तव्य केलंय. भविष्यात युती झाल्यास शिवसेनेसोबत जुळवून घेताना राणेंच्या पदाला धोका होऊ नये, म्हणून ही नरमाई तर नाही ना? असे प्रश्न आणि अनेक तर्कवितर्कांना तोंड फुटलंय.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

कोकणात शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे ‘मनोमिलन’; विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ

VIDEO: बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थकांचे राजीनामे, तर दुसरीकडे राणे समर्थकांचा जल्लोष

“नारायण राणेंना पंतप्रधान केलं, तरी शिवसेनेला दुःख वाटण्याचं कारण नाही”

Know what happened in Vengurla between Rane and Shivsena about alliance

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.