कोल्हापूर, सांगलीला अलमट्टी धरणामुळे महापूर नाही, अजित पवारांनी नेमकं कारण सांगितलं
गेल्या आठवड्यात पावसाने थैमान घातल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील काही भागात मोठं नुकसान झालं. अजित पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीचा महापूर कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे येतो असं म्हटलं जात होतं. मात्र याचा अभ्यास करण्याबाबत नेमलेल्या समितीने या महापुराला अलमट्टी जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली.
विशेषत: कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती येते असं म्हटलं जातं. त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं.
अजित पवार म्हणाले, “एक गोष्ट बोलली जाते, कर्नाटकात अलमट्टी धरण बनल्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुलाचा धोका वाढलेला आहे. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा केली. धरणातील आवक आणि जावक याबाबत समन्वय ठेवला. कर्नाटकने प्रतिसाद दिला. तसं काम आजही सुरु आहे. मागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यावेळच्या सरकारने एक समिती नेमली होती की खरोखरच अलमट्टीमुळे या दोन जिल्ह्यांना पूर येतो का, तर या समितीचा अहवाल आला, त्यामध्ये अलमट्टीमुळे पूर येतो असं काही म्हटलेलं नाही. पण वरची जी काही धरणं आहेत, राधानगरी, दूधगंगा, वारणा असेल, तारळी, मुरुडी अशी अनेक छोटी मोठी धरणं आहेत. कोयना धरण महत्त्वाचं, या सगळ्या धरणांचं पाणी कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा नद्यांना जातं. ते पाणी खाली जातं. त्यावेळी तिथं वॉटर लेक होतं आणि त्याचा फटका नागरिकांना होतो”
नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय
अलमट्टीबाबत दोन्ही राज्यांनी समन्वय साधला. अलमट्टीमुळे महापूर येतो असं अभ्यास समितीने म्हटलेलं नाही. सगळ्या नागरिकांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. जसे जसे पाणी ओसरत आहे तसे पंचनामे होतील. पिकांच्या नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.
जो पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तो पर्यंत पॅकेज घोषणा करता येणार नाही. आता तातडीची मदत सुरूच आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही 9 जिल्ह्यांच्या मदतीसाठी पुढं आलं पाहिजे,दानशूरांना आमचं आवाहन आहे, असं अजित पवार म्हणाले.
राज्यपालांनी कोणाला सोबत घेऊन जावं हा त्यांचा प्रश्न आहे. मला यावर काही बोलायचं नाही. दौरे होतील प्रोटोकॉल प्रमाणे माहिती दिली जाईल, असं म्हणत अजित पवारांनी राज्यपालांच्या तळीये भेटीवर भाष्य केलं.
VIDEO : कोल्हापूर, सांगलीला महापूर का? अजित पवारांनी कारण सांगितलं
अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
- गेल्या अनेक वर्षांत इतक्या कमी वेळात इतका जास्त पाऊस पडला नाही
- शेती,दुकानांचं नुकसान झालं
- ज्या जिल्ह्यात जे पालकमंत्री आहेत त्यांनी प्रशासना सोबत काम केलं
- स्थलांतंर केली
- सांगली आणि कोल्हापूर मध्ये जास्त स्थलांतर झालं
- पाण्याचा फुगवटा आल्याने ही परिस्थिती आली.. यावेळेचा पाऊस जास्त झाला त्यामुळं अतोनात नुकसान
- अलमट्टीमुळे पूर येतो का हा प्रश्न नेहमी येतो अलमट्टीमुळे महापूर येतो असं अभ्यास समितीने म्हटलेलं नाही
- महत्वाचा हायवे बंद पडल्याने पेट्रोल,डिझेल सारख्या अत्यावश्यक सेवेच्या गाड्या अडकून पडल्या
- सध्या रस्त्यांच्या मोऱ्या कमी पडत आहेत या ब्रिटिशकालीन आहेत
- आता बॉक्स किंवा स्लॅब प्रकारच्या मोऱ्या तयार करण्याचा निर्णय घेऊ
- जिथे रस्ते वाहून गेले तिथे तात्पुरती व्यवस्था केली जाईल
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दौऱ्याची महिती देणार
- मुख्यमंत्री दिल्लीशी संपर्क ठेऊन आहेत..
- वातावरण बदलामुळे हे संकट
- ओढ्या नाल्या मध्ये झालेली बांधकामा बाबत कठोर निर्णय घेणार
- अतिक्रमणे काढायला हवीत
- अधिकारी परवानगी देत असतील तर त्याच्यावर ही कारवाई होणार अलमट्टी बाबत दोन्ही राज्यांनी समन्वय साधला
- सगळ्या नागरिकांना मदत करणयाची सरकार ची भूमिका
- जसे जसे पाणी ओसरत आहे तसे पंचनामे होतील
- पिकांच्या नुकसान भरपाई बाबत लवकरच निर्णय घेऊ रस्त्या वाहतुकी बाबत नितीन गडकरी यांच्या बाबत चर्चा करणार
- भराव टाकून पूल नको ही ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे
- पंचगंगा नदीमधील गाळ वाढला असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे
- ती ही शक्यता तपासून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- पूर येतो तेव्हढ्या परत स्थलांतर करा अशी मागणी काहींनी केली
- कारखान्याच्या ठिकाणी वसाहत करून आशा लोकांच तात्पुरत स्थलांतर करता येईल का हा प्रस्ताव ठेवला आहे शहर स्वच्छतेसाठी पुणे मुंबई तून वाहन आली आहेत..आजून ही काही वाहन येत आहेत
- समुद्राच्या बाजूला संरक्षण भिंत बांधणार ह्या फक्त बातम्या
- असा कोणताही निर्णय नाही,ही फक्त एक मागणी आहे
- ज्या ज्या जिल्ह्यात हे संकट आले तेथील लोकांना उभं करण्याच काम महाविकास आघाडी करेल जो पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तो पर्यँय पॅकेज ही घोषणा करता येणार नाही
- आता तातडीची मदत सुरूच आहे
- महाराष्ट्रातील जनतेने ही 9 जिल्ह्याच्या मदतीसाठी पुढं आलं पाहिजे,दानशूराना आमचं आवाहन आहे
- राज्यपालांनी कोणाला सोबत घेऊन जावं हा त्यांचा प्रश्न
- मला यावर काही बोलायला नाही
- दौरे होतील प्रोटोकॉल प्रमाणे माहिती दिली जाईल
संबंधित बातम्या
अजित पवारांचा कोल्हापूर दौरा, शिरोळमध्ये पाहणी, पंचगंगा पुलावरुन आढावा, व्यापाऱ्यांशी चर्चा