14 वर्षीय मुलगी शेतातील विहिरीतून पाणी काढत होती; म्हशीचा धक्का लागला अन्….

ही घटना आजीच्या डोळ्यासमोरच झाली. यावेळी आजीने आरडाओरड सुरू केला. पण शेतामध्ये कोणी उपस्थित नव्हते.

14 वर्षीय मुलगी शेतातील विहिरीतून पाणी काढत होती; म्हशीचा धक्का लागला अन्....
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 10:30 AM

कोल्हापूर : चौदा वर्षीय मुलगी आजीसोबत शेतात गेली. तिथं विहिरीतील पाणी ओढत होती. तेवढ्यात म्हशीने तिला धक्का दिला. त्यामुळे ती विहिरीतील पाण्यात फेकली गेली. तिने स्वतःच्या बचावासाठी हातपाय हलवले. पण, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाला. आजीच्या डोळ्यासमोर ही घटना घडली. मात्र, ती आरडाओरडा केल्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. लोकं गोळा झाले. तोपर्यंत या मुलीने प्राण सोडले होते. विहिरीच्या बाहेर तिचा मृतदेहच काढण्यात आला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आजरा शहरातील भारतनगरमधील ही घटना आहे. कार्तिकी सचिन सुतार (वय वर्ष १४) या शालेय विद्यार्थिनीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. माद्याळकर यांच्या शेतातील विहिरीत ही घडना घडली.

KOLHAPUR N 1

म्हशीचा धक्का लागला आणि…

काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराची वेळ. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची वर्दी आजरा पोलिसात दिलेली आहे. कार्तिकी ही आपल्या आजीबरोबर शेतामध्ये विहिरीतील पाणी ओढत होती. तेवढ्यात झाडाच्या शेजारील बांधलेल्या म्हशीचा धक्का लागला. यामुळे कार्तिकी विहिरीतील पाण्यात पडली. ही घटना आजीच्या डोळ्यासमोरच झाली. यावेळी आजीने आरडाओरड सुरू केला. पण शेतामध्ये कोणी उपस्थित नव्हते.

हे सुद्धा वाचा

आजीच्या डोळ्यासमोर घडली घटना

यावेळी झालेला गोंधळ पाहून काही वेळानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी पाण्यातला मृतदेह बाहेर काढला. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला.

कार्तिकी घरच्या कामात मदत करत होती. मात्र, म्हशीने तिचा घात केला. झाडाला बांधून असलेल्या म्हशीने तिला धक्का मारला. त्यामुळे तिचा तोल विहिरीत पडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हशीला तिथं बांधले नसते तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.