तुम्ही नादच केलाय थेटsss, ना IIT, ना ‘मोठी’ डीग्री, कोल्हापूरच्या अमृताला 41 लाखांचं पॅकेज!
राज्यात सध्या कोल्हापूरची अमृता कारंडे चर्चेचा विषय बनली आहे. कोल्हापूरमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील अमृता राज्यभर चर्चेचा विषय बनण्याचं कारणं नेमकं काय आहे. अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे.
कोल्हापूर: राज्यात सध्या कोल्हापूरची अमृता कारंडे चर्चेचा विषय बनली आहे. कोल्हापूरमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील अमृता राज्यभर चर्चेचा विषय बनण्याचं कारणं नेमकं काय आहे. अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या इंजिनिअरिंगला बरे दिवस नाहीत, असं चित्र संगळीकडं आहे. मात्र, अमृतानं कोणत्याही विषयाचा अभ्यास सकारात्मकपणे आणि सातत्यानं केला की यश आपल्यापासून दूर राहत नाही हे दाखवून दिलं आहे. कोल्हापूरच्या अमृताला जगप्रसिद्ध अडोब कंपनीनं 41 लाखांचं पॅकेज दिलय. अमृताच्या या यशाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
इंजिनिअरिंग चेष्टेचा विषय, पण अमृतानं करुन दाखवलं
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या संख्येनं अभियांत्रिकी महाविद्यालयं स्थापन झाली. अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढल्यानं मोठ्या संख्येने इंजिनिअरिंग उत्तीर्ण असलेले विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांना नोकरी मिळणं अवघड होऊ लागलं. इंजिनिअरिंगची महाविद्यालय देखील ओस पडू लागली होती. इंजिनिअरिंग हा सध्या सगळीकडेच चेष्टेचा विषय बनलाय. या क्षेत्रातील बेरोजगारीमूळे तर याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. आता इंजिनिअरिंग मराठी भाषेतून देखील शिकवलं जाणार आहे. मात्र, या इंजिनियरिंग क्षेत्रातही मोठ्या संधी असू शकतात हे कोल्हापुरातल्या केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी अमृता कारंडे दाखवून दिलंय. कारण, मध्यम वर्गीय कुटुंबातील अमृताला अडोब या एका प्रसिद्ध कंपनीने एक दोन नाही तर तब्बल वार्षिक 41 लाखांच्या वार्षिक पॅकेजवर करारबद्ध केलंय.
मोठं पॅकेज असणारी पहिलीच प्लेसमेंट
आयआयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना इतक्या पगाराच्या नोकऱ्या सहज उपलब्ध होतात. मात्र ,इंजिनिअरिंग शिक्षण घेत असतानाच इतक्या मोठ्या रकमेची प्लेसमेंट महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच होतेय. अमृता कारंडे सध्या कोल्हापुरातील ‘केआयटी’ महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत होती. नुकतेच तिने चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे.
अमृतानं यश कसं मिळवलं?
अमृता कारंडे तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच ‘ॲडोब’ कंपनीने ‘C कोडिंग’ ही देशस्तरावरील अभिनव स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन अमृताची अडीच महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. या इंटर्नशिप दरम्यान तिला मासिक 1 लाख रुपये शिष्यवृत्तीही मिळत होती. या इंटर्नशिप दरम्यान घेण्यात आलेल्या विविध चाचणी परीक्षांमधून तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती. तिने दाखवलेली गुणवत्ता प्रमाणभूत धरून ”ॲडोब कंपनीने तिला ही खास प्रीप्लेसमेंटची ऑफर दिली आहे. ही प्लेसमेंट देशपातळीवरील विशेष म्हणून गणली जाते. अमृता आता ॲडोब कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून रुजू होणार आहे. इतकी मोठी संधी मिळाल्याचं समाधान अमृता बरोबरच तिच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना देखील आहे.
केआयटी कॉलेज कोल्हापूरचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जींनी यांनी अमृतानं मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केलं आहे. अमृतानं केआयटी कॉलेजची मान उंचावल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अमृताला पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
इतर बातम्या:
Kolhapur Student Amruta Karande get 41 lakh rupees package from Adobe company