भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता यांचेही नाव; शहाजीबापू पाटील म्हणतात,…

टोमणे मारण्याशिवाय राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेला काम राहीलं नाही. शिंदे आणि फडणवीस हे रात्रंदिवस काम करतात. जनतेचे प्रश्न सोडवत आहेत.

भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता यांचेही नाव; शहाजीबापू पाटील म्हणतात,...
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 8:26 AM

लातूर : मंत्री शहाजीबापू पाटील हे काल लातुरच्या (Latur) दौऱ्यावर होते. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेची गुढी आम्ही पुन्हा उभी करू. यावर बोलताना शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे संजय राऊत यांना नवीन गुढी उभी करावी लागणार आहे. याचा अर्थ राऊत यांनी शिंदे यांचे नेतृत्व वाढलेले आहे. मोठे झालेले आहे. हे मान्य केलंय.

शिंदे यांच्या सभेला मोठी गर्दी

आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त खुर्च्यांचे मंत्री आहेत. यावर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्याला कोणताही आधार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री असताना लोकप्रीय होते. आज ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार हाती घेतल्यापासून सर्वसामान्य जनतेचा प्रश्न मार्ग लागत आहे. त्यासाठी ते कष्ट करत आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे. त्यांच्या सभेला लाखो लोकांची गर्दी होते. हे यातून दिसून येते.

हे सुद्धा वाचा

भावी होण्याला काही अडचण नाही

राज ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला. भावी मुख्यमंत्री या पाच-सहा महिन्यांत सात-आठ झालेत. भावी होण्याला काही अडचण नाही. अजूनही दहा-बारा भावी मुख्यमंत्री झालेत तरी अडचण नाही. परंतु, उद्या निवडणूक झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होणार, असा मला विश्वास वाटत असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.

टोमणे मारण्याशिवाय त्यांना काम नाही

कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे चांदवडला गारपिटीची पाहणी करायला गेले होते. एनसीपीनं सत्तार यांच्यावर खोचट टोला लगावला. रात्रीला दिसत असेल, म्हणून ते गेले, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यावर शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. शेतकऱ्यांचं नुकसान बघत जात असताना दिवस मावळताना एखाद्या ठिकाणी गेले तरी बोलून नुकसान लक्षात घेता येते. ते रात्री ९ वाजता बैठक घेतली तरी अंदाज येतो, गावात काय घडलं. टोमणे मारण्याशिवाय राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेला काम राहीलं नाही. शिंदे आणि फडणवीस हे रात्रंदिवस काम करतात. जनतेचे प्रश्न सोडवत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.