Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपुरात पुन्हा ‘चिअर्स’, तब्बल 6 वर्षानंतर दारु विक्री सुरु, दुकानांसमोर मद्य शौकिनांची रेलचेल

अवघ्या काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याच्या घोषणा करण्यात आली होती. यानंतर मद्यप्रेमी आणि दारूविक्रेते प्रत्यक्षात दारूविक्री कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले होते.

चंद्रपुरात पुन्हा 'चिअर्स', तब्बल 6 वर्षानंतर दारु विक्री सुरु, दुकानांसमोर मद्य शौकिनांची रेलचेल
Liquor (फोटो प्रातनिधिक)
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 1:33 PM

चंद्रपूर : अवघ्या काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याच्या घोषणा करण्यात आली होती. यानंतर मद्यप्रेमी आणि दारूविक्रेते प्रत्यक्षात दारूविक्री कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले होते. अखेर आज (5 जुलै) चंद्रपूर शहरात प्रत्यक्ष दारुविक्री सुरु झाली आहे. तब्बल 6 वर्षानंतर दारूची विक्री सुरू झाल्याने मद्यप्रेमी आणि विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Liquor shops starts after six years in Chandrapur happiness among the liquor lovers and sellers)

चंद्रपुराती दारुबंदी उठवण्याची मागणी

चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क विभागाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 98 दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. गेल्या सहा वर्षांत चंद्रपुरात कोट्यवधींची दारू विकण्यात आली. त्यामुळे हजारो नवीन गुन्हेगार तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी फसवी असून ती उठविण्याची मागणी समोर आली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. मंत्री विजय वडेट्टीवार या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून नागरिकांकडून यावर प्रतिक्रिया मागितल्या. यावर हजारो नागरिकांनी दारुबंदी उठविण्याची मागणी केली. त्यानंतर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी राज्य शासनाकडे अहवाल सादर केला.

दारुविक्रीची दुकान सुरु

यानंतर राज्य शासनाने समिती गठीत करून दारूबंदीचा अभ्यास केला. या समितीच्या अहवालानंतर शासनाने दारूबंदी उठविण्याची घोषणा करीत अधिसूचना जारी केली. उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्री परवान्यांचे नूतनीकरण प्रक्रिया सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील अनेकांनी अर्ज केले.

या अर्जाची पडताळणी केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने मोक्कातंर्गत चौकशी करत मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी एक वाईन शाप, 6 बिअर शॉपी, 65 बिअर बार आणि 26 देशी दारू दुकाने यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ही दुकाने आजपासून सुरू झाली आहेत.

(Liquor shops starts after six years in Chandrapur happiness among the liquor lovers and sellers)

संबंधित बातम्या : 

Weather Alert: राज्यात मान्सूनला पोषक वातावरण नाही; पावसासाठी 15 जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार

मैत्रिणीला भेटायला आला आणि अडकला, गँगस्टर सोनू पठाणला अटक, समीर वानखेडेंच्या पथकाची कारवाई

अकोल्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, पावसाअभावी 70 टक्के पेरण्या खोळंबल्या

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.