मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर माघारी, कोयनानगरात खराब हवामान, उद्धव ठाकरे पुण्यातून मुंबईत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज पूरग्रस्त सातारा जिल्ह्याला (Satara Rain) भेट देऊन पाहणी करणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरातून माघारी फिरलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर माघारी, कोयनानगरात खराब हवामान, उद्धव ठाकरे पुण्यातून मुंबईत
CM Uddhav Thackeray helicopter
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 3:09 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज पूरग्रस्त सातारा जिल्ह्याला (Satara Rain) भेट देऊन पाहणी करणार होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरातून माघारी फिरलं आहे. सातारा आणि कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आणि खराब हवामान यामुळे कोयनानगरातील हेलिपॅडवर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हे हेलिकॉप्टर पुणे विमानतळाकडे माघारी फिरलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यावरुन सकाळी 11 च्या सुमारास कोयनानगरकडे रवाना झालं. 11.30 वाजता ते कोयनानगर हेलिपॅडवर पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे हे हेलिकॉप्टर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर पुण्यात परतलं.

मुख्यमंत्र्यांनी आमची भेट घ्यावी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. ते कोयनानगर परिसरातील पूरग्रस्त बांधवांची भेट घेणार होते यासाठी प्रशासनाने तयारी केली होती. ज्या नागरिकांना पुराचा फटका बसलेला आहे ज्यांचं सर्वस्व या दुर्घटनामध्ये हिरावलेलं आहे त्यांना मुख्यमंत्री भेटणार होते मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाल्याने पुरग्रस्तांसाचा हिरमोड झालाय. पूरग्रस्तांना स्थलांतर करून कोयनानगरच्या प्राथमिक शाळेत ठेवण्यात आलं होतं जिथे मुख्यमंत्री त्यांची भेट घेऊन धनादेशच्या माध्यमातून आर्थिक मदत करणार होते मात्र मुख्यमंत्री आज खराब हवामानामुळे पोहोचू शकले नाहीत. पण मुख्यमंत्र्यांनी आमची भेट घ्यावी आमच्या व्यथा समजून घ्याव्यात अस या पूरग्रस्त लोकांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलंय. आम्हाला आधाराची गरज आहे आम्ही आमच्या जवळच्या लोकांना गमावलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमच्या वेदना त्यांच्या समजून त्यांनी आमची भेट घ्यावी अस या लोकांनी म्हटलंय.

निवारा छावणीला भेट देण्याचं नियोजन

मुख्यमंत्री साताऱ्यातील कोयनानगर (Koynanagar) येथील पूरग्रस्तांच्या निवारा छावणीला ते भेट देण्याचं नियोजन आहे. पाटण तालुक्यातील (Patan) पूर परिस्थितीची पाहणी करतील तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील. (Maharashtra CM Uddhav Thackeray tour rain affected Satara Patan Koynanagar landslide live update today)

सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले आहे. मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होत आहेत.

दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून मुख्यमंत्र्यांचे 11.30 वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होईल. नंतर 11.40 वाजता ते कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देतील आणि पूरग्रस्तांची विचारपूस करतील. दुपारी 12.15 वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 1.25 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना होतील.

मुख्यमंत्र्यांचा चिपळूण, रायगड दौरा 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल 25 जुलैला चिपळूणचा तर 24 जुलैला रायगड जिल्ह्यातील तळीये दरडग्रस्त भागाचा दौरा केला. तळीये इथं दरड कोसळून 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

लोकप्रियतेसाठी लगेच घोषणा नाही, आढव्यानंतर भरपाई 

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले.

वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता असेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या 

Video: सीएम बीएम गेला उडत, आम्हाला नावं नका सांगू कुणाची? राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले

Chiplun Flood | मुख्यमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी, दुकानदारांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे व्यथा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.