Sindhudurg Landslide: सिंधुदुर्गात पावसाचा पहिला बळी, कणकवलीच्या दीगवळेत दरड कोसळली, एका महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर
मुसळधार पावसाने सिंधुदुर्गात हाहाकार उडवला आहे.या मुसळधार पर्जन्यवृष्टीने कणकवली तालुक्यातील दीगवळे गावात घरावर डोंगर खचून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाने सिंधुदुर्गात हाहाकार उडवला आहे.या मुसळधार पर्जन्यवृष्टीने कणकवली तालुक्यातील दीगवळे गावात घरावर डोंगर खचून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.तर, अन्य दोघेजण जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दिगवळे गावातील या जाधव कुटुंबाचा संपूर्ण संसारच या पावसाने रस्त्यावर आणला.फार मोठी हानी या कुटुंबाची झाली आहे.
काल दिवसभर सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडला.सह्याद्रीच्या पट्ट्यात तर या पावसाने दाणादाण उडवली. त्याचाच फटका डोंगराळ भागातील दिगवळे गावाला बसलाच पण या गावातील जाधव कुटुंबाची अधिकच हानी झाली.जाधव कुटुंबातील तिघे जण नवरा,बायको आणि वडील गाढ झोपेत असताना घरावर रात्री तीनच्या सुमारास डोंगर खचून ढिगारा कोसळला.यात तिघे ही ढिगाऱ्या खाली सापडले.यातील महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोघेजण जखमी आहेत.एकाची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.
रात्री तीनच्या सुमारास घटना
47 वर्षाचे प्रकाश जाधव हे अपंग असून शेती हेचं त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.ते वडील,पत्नी आणि मुलासह राहत होते.काल दिवसभर पाऊस कोसळत होता त्यामुळे काल ते कोणीच शेतात गेले नाहीत.रात्री मुलगा शेजाऱ्यांकड झोपायला गेला.घरात ते व त्यांची पत्नी संगीता आणि वडील एवढी तीनच माणसे होती.त्यांचे वडील घरातल्या बाहेरच्या खोलीत झोपले तर ही दोघं नवरा बायको मागच्या खोलीत झोपले होते.गाढ झोपेत असताना रात्री तीनच्या सुमारास या घरावर व जाधव कुटुंबावर काळाने घाला घातला.डोंगर खचून सर्व माती, दगड व मोठ मोठे वृक्ष घरावर कोसळले.यात हे तिघेही जण गाढले गेले.सकाळी सहाच्या सुमारास शेजाऱ्यांना समजताच त्यांनी धावपळ करून ढिगाऱ्या खालून या तिघांना बाहेर काढल.प्रकाश यांचे वडील बाहेरच्या खोलीत असल्यामुळे तिथे जास्त मलबा नव्हता.मात्र प्रकाश आणि संगीता पूर्णपणे मातीत गाडले गेले होते.प्रकाश हे ढिऱ्याखालून वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते तर त्यांच्या पत्नीचा ढिऱ्याखालीच मृत्यू झाला होता.42 वर्षाच्या संगीता जाधव यांनी ढिगा- याखालीच या जगाचा निरोप घेतला, अशी माहिती एकनाथ जाधव यांनी दिली.
पाच ते सहा फुटांची दलदल
मातीचा आणि दगडांचा लोट एवढा मोठा होता की घराशेजारील कित्येक भागात नुसती पाच ते सहा फुटांची दलदल निर्माण झाली आहे.मोठ मोठे वृक्ष नेस्तनाबूत झाले आहेत.गरीब जाधव परिवाराला या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला असून घरा बरोबरच आणि घरमालकिनी बरोबरच संपूर्ण संसार ही वाहून गेला आहे.
इतर बातम्या:
Maharashtra Landslides LIVE News Updates Sindhudurg Kankavali digwale village landslide one woman died two injured