Maharashtra LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Pune Bandh Live Update in Marathi : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई: केंद्र सरकारने गरीबांना 2023पर्यंत मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील लाखो गरिबांना मोठा दिलासा मिळणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा आज दिल्लीत पोहोचणार आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमध्ये सतर्कता बाळगली जात आहे. आज राज्यातील काही मंदिरांमध्ये मास्क सक्तीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
वसई : प्रेमसंबंधातून तुनीशा शर्मा हिची आत्महत्या
आलीबाबा या मालिकेतील अभिनेता सेजाण विरोधात तुनीशाच्या आईची तक्रार
सेजण आणि तुनीशा या दोघांचे प्रेमसंबंध होते
प्रेमसबंधातून तिने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले
या प्रकरणात सेजण याला पोलिसांनी ताब्यात घेतले
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शक्यता
-
बसच्या मागणीसाठी विद्यार्थिनींचा रास्ता रोको
एसटी बस मिळत नसल्याने 5 तासांपासून विद्यार्थिनींचा रास्ता रोको
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील विद्यार्थिनी संतप्त
अहमदनगर जिल्ह्यातील तारकपूर बस स्टॅन्डसमोर रास्ता रोको
पोलिसांनी हस्तक्षेप करून बस उपलब्ध करून दिल्यानंतर वातावरण निवळले
-
-
वसतिगृहातील आदिवासी मुलांचे आंदोलन
वसतिगृहातील आदिवासी मुलांचे आंदोलन
पनवेलमधील मुलांची वसतिगृहात डीबीटी वाढवून देण्याची मागणी
चूल पेटवत वसतिगृहात केलं आंदोलन
तर यापुढे अर्ध नग्न आंदोलन करू असा इशारा
-
ठाणे क्राईम युनिट पाचची मोठी कामगिरी
ठाणे शहरात विक्री साठी आलेले 20 लाख रुपयाचे अमली पदार्थ केले जप्त,
ठाण्यातील कोरम मॉल येथे तीन नायजेरियन व्यक्ती हे अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती मिळताच,
ठाणे क्राईम युनिट पाच ने सापळा रचत या आरोपीना ताब्यात घेतले आहे.
या आरोपीकडून ऐकून 60ग्राम एम डी आणि 70 ग्राम कोकेन पकडले असून याची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.
तर या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत आहे.
-
चोऱ्यांचं प्रमाण वाढलं, सीसीटीव्ही कुठे आहेत?
पुण्यातील धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या तीन वर्षांपासून काढले आहेत
कार्यालयाच्या पाठीमागे कचरा डेपो आहे यातील गाड्यांमधील डिझेल चोरीला जातंय
महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे
बच्चु कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष साठेंचा आरोप
सीसीटीव्ही बसवा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला
-
-
महाराष्ट्र एकीकरण समितीच सोमवारी कोल्हापुरात आंदोलन
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणार आंदोलन,
आंदोलनाच्या नियोजनासाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक,
कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात पार पडते बैठक,
बैठकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कोल्हापुरात दाखल.
-
वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले, मुंब्र्यातील भाजप पदाधिकारी रिदा राशिद यांच्यावर गुन्हा दाखल
मुंब्रा येथे महिलांना त्यांच्या कामाची गरज ओळखून जाणीवपूर्वक वेश्या व्यवसाय करायला लावायच्या
तक्रारदार महिलेचा आरोप
याच रिदा राशीद यांनी गेल्या महिन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा केला होता दाखल
-
जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादीचे घाटकोपरमध्ये निदर्शने
घाटकोपरच्या अमृत नगर सर्कल येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन
यावेळी सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली
50 खोके एकदम ओके आणि Ed सरकारचा निषेध असो आदी घोषणा देण्यात आल्या
-
जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या 9 वर्षीय शाळकरी मुलीवर हॉटेलमधील रुममध्ये अत्याचार
राजगुरुनगर-पुणे : खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या 9 वर्षीय शाळकरी मुलीवर हॉटेलमधील रुममध्ये अत्याचार,
मुलीच्या वडीलांनी खेडला बोलावले असल्याचे सांगुन चिमुकल्या मुलीला शाळेतुन घेऊन जाऊन हॉटेलमध्ये केल अत्याचार,
अत्याचार केल्यानंतर पिडित शाळकरी मुलीला पुन्हा शाळेत सोडले,
शाळकरी मुलगी शाळेत शिक्षकांच्या ताब्यात असताना मुलीवर अत्याचार झाल्याची घटना,
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह,
पिडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन राजगुरुनगर पोलीसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल,
कल्याण सोनबा राक्षे असे अत्याचार करणा-या व्सक्तीचे नाव.
-
आमदार जयकुमार गोरे यांचे स्विय सहायक रुपेश साळुंके यांची प्रकृती गंभीर
आमदार गोरे यांचे स्विय सहायक रुपेश साळुंके यांना रुबी रुग्णालयात दाखल करणार
स्विय सहायक रुपेश साळुंके बारामतीतील रुग्णालयात केले होते दाखल
-
पुणे काँग्रेस भवनमध्ये केलेल्या होमहवन प्रकरणी कारवाईचे आदेश
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेत आदेश,
पक्षाची भरभराट व्हावी यासाठी 1 डिसेंबरला काँग्रेस भवनमध्ये गोपनीय पद्धतीने होमहवन करण्यात आला होता,
होमहवन प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश
-
निफाडचा किमान तापमानाचा पारा घसरला
नाशिक : थंडीचे राज्यात जोरदार पुनरागमन,
कुंदेवाडी येथे 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद,
या थंडीच्या हंगामात चौथ्यांदा किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली,
या गुलाबी थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या.
-
नाशिक महापालिकेच्या बससेवेसाठी तपोवनात होणार 200 बसेसचा डेपो
सिटीलिंक कंपनीने निमाणी बस स्थानकावर मारली फुली,
डिसेंबर अखेरपर्यंत डेपोचे काम करण्यासाठी अल्टिमेटम,
स्वतःचे बस डेपो पूर्ण विकसित नसल्याने सिटीलिंक कंपनीला घ्यावा लागतो राज्य परिवहन महामंडळाच्या निमाणी बसस्थानकाचा आधार,
सुमारे एक लाख रुपये मासिक भाडे असलेले निमाणी बसस्थानक वापरणे खर्चिक,
-
जयकुमार गोरे यांच्यासह सहकाऱ्यांची तब्येत गंभीर
आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात
थोड्याच वेळात जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार
रात्री साडेतीनच्या सुमारास जयकुमार गोरे यांच्या गाडीला झाला होता अपघात
जयकुमार गोरे यांच्यासह सहकाऱ्यांची तब्येत गंभीर
तिघांना बारामतीच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात येणार
-
सारंगखेड्याच्या घोडेबाजाराने विक्रीची सर्व विक्रम मोडले
सारंगखेड्याच्या घोडेबाजाराने विक्रीची सर्व विक्रम मोडले
गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक उलाढाल
घोडेबाजार ने केला चार कोटीचा टप्पा पार
अजून घोडे विक्री होण्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे
-
नाताळ सणासाठी पुण्यातील मार्केट सज्ज
निरनिराळे ख्रिसमस ट्री आणि छोट्या सांतांनी पुण्यातील भोरे आळीतलं मार्केट फुललं
ख्रिसमसच्या खरेदीसाठी पुणेकरांची मोठी गर्दी
दुकानात पुणेकरांनी केली गर्दी
ख्रिसमस ट्री सोबतच सजावटींच्या वस्तुंनी देखील भरली व्यापाऱ्यांची दुकाने
दोन वर्षानंतर पूर्ण निर्बंध मुक्त नाताळ होणार साजरा
-
उद्योगपती सायरस मिस्त्री अपघातप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात पोलीस तपासावर प्रश्न निर्माण केलाय
पालघर पोलिसांकडून योग्य रित्या तपास करण्यात येत नसल्याचा याचिकेत आरोप
सुरू असलेल्या तपासाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
याप्रकरणात कलम 304 लावण्याची याचिकेत मागणी
गुन्ह्यात आरोपी विरोधात अजामीन पात्र कलम दाखल करण्याची याचिकेत मागणी
पालघर येथील संदेश शिवाजी जेधे यांनी अॅड. सादिक अली यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात या जनहित याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता
-
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसापासून थंडी वाढली
अचानक गायब झालेल्या थंडीने पुन्हा जोर धरलाय
परिसरात गारठा अचानक वाढलाय
थंड हवा वाहत असल्याने थंडी जाणवू लागलीय
ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटू लागल्यात
ग्रामस्थ पहाटेच्यावेळी आणि रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत
थंडी पडल्याने उबदार कपडे घेण्यासाठी दुकानांवर गर्दी दिसून येत आहे
-
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन तनपूरे यांची मागणी
मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आतील, टिकणारे आरक्षण दिले पाहिजे
असे मत मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुनराव तनपूरे यांनी परभणीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले
मराठा सेवा संघाच्या राज्यव्यापी महाअधिवेशनानिमित्त परभणीत पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे विधान केले
-
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आता मास्क सक्ती
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येणाऱ्या भाविक, पुजारी, कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आलीय
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसह मास्क बंधनकारक असणार आहे
मंदीर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबत आदेश काढले
कोरोना BF 7 व्हेरीयंटच्या अनुषंगाने उपाय योजना केल्या जात आहेत
तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव 30 डिसेंबरपासून घटस्थापनेने सुरुवात होत आहे. त्यातच मास्क बंधनकारक केले आहे
राज्यातील अनेक मंदिरात मास्क सक्ती केली जात आहे
Published On - Dec 24,2022 6:21 AM