नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात होत असते. मात्र, या वर्षी सर्वात कमी पाऊस नंदूरबार जिल्ह्यात झाला आहे.

नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना 'हा' सल्ला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 9:01 PM

नंदूरबार: जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात होत असते. मात्र, या वर्षी सर्वात कमी पाऊस नंदूरबार जिल्ह्यात झाला आहे. तर दुसरीकडे सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली तर 15 जिल्ह्यात मुसळधार आणि 16 जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल. मात्र ,नंदूरबार जिल्ह्यात यावेळेस ही पावसाने हुलकावणी दिल्याने फक्त 44 टक्के पाऊस झाला आहे.

या वर्षी मान्सून मध्ये बंगालच्या उपसागरात असमान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कमी जास्त पाऊस होत आहे.जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊसाचे प्रमाण कमी होते.जुलै च्या शेवटच्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात समाधान कारक पाऊस झाला. कोकणात अतिवृष्टी तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये मुसळधार पाऊस झाला. मात्र, उत्तर महाराष्ट्र पावसाचे प्रमाण कमी होते. त्यात नंदुरबार जिल्ह्यात आता पर्यंत राज्यातील सर्वात कमी पाऊस झाला आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे सचिन फड यांनी दिली आहे.

सूर्यफूल लावण्याचं आवाहन

जिल्ह्यात सरासरी पेक्षा 45 टक्के पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणारा पिकाची लागवड करावी बाजरी सूर्यफूल तूर या पिकाची लागवड करावी असं हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे.राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

आयएमडीकडून मान्सूनचा उर्वरित अंदाज जाहीर

भारतीय हवामान विभागाकडून यंदा प्रथमच पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात हवामानाचा अंदाज जारी करण्यात येत आहे. हवामान विभागाचे मुख्य अधिकारी डॉ.महापात्रा यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला. पावसाळ्याच्या या कालावधीमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरी इतका राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सन 2021 च्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सरासरी इतका कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात या काळात सरासरीच्या 95 ते 105 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महन्यात देशात सर्वत्र पाऊस पडेल असाही अंदाज आयएमडीच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या:

Weather Forecast: आयएमडीकडून ऑगस्ट सप्टेंबरसाठी हवामानाचा अंदाज जारी, महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहणार?

ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Maharashtra Rain Update Nandurbar recorded low rain in state farmers are waiting for heavy rainfall

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.