चंद्रपूर जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता, पोंभुर्ण्याने भाजपची लाज राखली
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीने सहापैकी पाच ठिकाणी यश मिळविले. केवळ पोंभुर्णा या एकाच जागेवर भाजपाला झेंडा रोवता आला. सत्तेसाठी महाविकास आघाडी एकत्र आली.
चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीने सहापैकी 5 ठिकाणी यश मिळविले आहे. केवळ पोंभुर्णा या एकाच जागेवर भाजपाला (BJP flag) झेंडा रोवता आलाय. आज या 6 जागी नवे कारभारी निवडण्यासाठी मतदान पार पडले. जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढली नसली तरी अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी मात्र तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीनंतर विजयी उमेदवारांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी नगरपंचायत निवडणूक की बाहेर एकच जल्लोष केला. गोंडपिपरी नगरपंचायतीवर काँग्रेस – शिवसेनेचा झेंडा रोवला गेलाय. यात नगराध्यक्ष पदावर काँग्रेसच्या (Congress) सविता कुळमेथे तर उपनगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या ( Shiv Sena) सारिका मडावी विजयी झाल्या आहेत.
पोंभुर्णा नगरपंचायतवर भाजपचा झेंडा
पोंभुर्णा नगरपंचायतीवर भाजपने आपला झेंडा रोवला. नगराध्यक्षपदी सुलभा पिपरे तर उपनगराध्यक्षपदी अजित मंगळगिरीवार यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींपैकी फक्त एका ठिकाणी भाजपनं आपली लाज राखली आहे. निवडणूक स्वतंत्रपणे लढली, तरी अन्यत्र महाविकास आघाडी सत्तेसाठी एकत्र आली. त्यामुळं भाजपचे पानीपत झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीने सहापैकी पाच ठिकाणी यश मिळविले. केवळ पोंभुर्णा या एकाच जागेवर भाजपाला झेंडा रोवता आला. सत्तेसाठी महाविकास आघाडी एकत्र आली.
सावली नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा
सिंदेवाही- लोणवाही नगरपंचायतीवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली आहे. नगराध्यक्षपदी स्वप्नील कावळे तर उपाध्यक्ष मयूर सूचक यांची निवड झाली आहे. कोरपना नगरपंचायत काँग्रेसने जिंकली आहे. नगराध्यक्ष नंदाताई बावणे, उपाध्यक्षपदी शेख इसाईल रसूल विजयी झाले आहेत. जिवती नगरपंचायतीवर काँग्रेस- राष्ट्रवादी यांची सत्ता स्थापन झाली आहे. नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीच्या कविता आडे तर उपाध्यक्ष पदी डॉ. अंकूश गोतावळे विजयी झाले आहेत. सावली नगरपंचायतीवर काँग्रेसने झेंडा रोवला. अध्यक्षपदी लता लाकडे तर उपाध्यक्ष म्हणून संदीप पुण्यापकार यांची निवड झाली आहे.