गडचिरोलीत नक्षलविरोधी मोठी कारवाई, चार समर्थक जेरबंद, पथकाने कशी केली कारवाई?
गडचिरोली जिल्ह्यातील दामरेचा जंगलात स्फोटक पुरवणाऱ्या चार आरोपींना अटक (Four accused arrested,) करण्यात आली. जंगलात छत्तीसगड राज्यात वायर बंडल स्फोटक पदार्थ व काही नक्षलवाद्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवठा हे समर्थक करत होते. सदर कारवाई अहेरी तालुक्यातील दामरेचा पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली.
गडचिरोली : उपविभाग जीमलगट्टा अंतर्गत भंगारामपेठा गावात नक्षलसमर्थक (pro-Naxal) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्त्वात व शिघ्र कृती दलाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान (anti-Naxal campaign) राबविले. तेलंगणातून दामरेचामार्गे छत्तीसगड येथे साहित्याची वाहतूक सुरू होती. चार नक्षलसमर्थकांकडून दहा नग कार्डेक्स वायरचे बंडल (Bundle of cardex wire) नेले जात होते. हे बंडल साडेतीन हजार मीटर लांबीचे आहे. हे साहित्य जप्त करण्यात आले. करीमनगर जिल्ह्यातील आसिफनगरचे राजू सल्ला, अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा येथील काशिनाथ गावंडे, साधू तलांडी, करीमनगर जिल्ह्यातील आसिफनगरचा मोहम्मद शादुल्ला व अहेरी येथील सिनू मुल्ला गावडे या आरोपींना अटक करण्यात आली.
वायरचा उपयोग हँडग्रेनेड बनविण्यासाठी
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी घातपाती हिंसक कारवाया केल्या जातात. विविध प्रकारची बनावटी शस्त्र बाळगले जातात. तसेच स्फोटक साहित्याचा वापर केला जातो. हे नक्षलसमर्थक कार्डेक्स वायर नक्षल्यांना पुरविणार होते. याचा वापर हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी केला जातो. गडचिरोली जिल्ह्यातील दामरेचा जंगलात स्फोटक पुरवणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली. जंगलात छत्तीसगड राज्यात वायर बंडल स्फोटक पदार्थ व काही नक्षलवाद्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवठा हे समर्थक करत होते. सदर कारवाई अहेरी तालुक्यातील दामरेचा पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर अधीक्षक सोयम मुडे, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांनी केली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी जवानांचे कौतुक केले. या घटनेतून नक्षलवाद्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या नक्षलसमर्थकांवर कडक कारवाईचा इशारा दिला.