Gadchiroli Health | गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात मलेरिया; आरोग्य संचालकांनी बिनागुंडा जंगलात केली पायी वारी
गडचिरोली हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग. येथील बिनागुंडा डोंगर भागात मलेरियानं हातपाय पसरविले. मलेरियाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य संचालकांचं पथकं जंगलात गेले. पायी प्रवास केला. आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.
गडचिरोली : जिल्ह्यात सध्या मलेरिया वाढत आहे. त्यामुळं मलेरिया रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे संचालक कार्यालयाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली (Aheri, Sironcha, Bhamragad, Etapalli) या चार तालुक्यातील पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी यावेळी करण्यात आली. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथकाने (चंबु) आठ किलोमीटर पायदळ डोंगराळ भागातून प्रवास केला. आरोग्य संचालिका अर्चना पाटील पुणे व आरोग्य संचालक मुंबई सतीश पवार यांच्यासह उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर (Deputy Director, Health Department, Nagpur) व जिल्हा शल्यचिकित्सक (District Surgeon) जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी हा खडतर प्रवास केला.
15 प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी
यावेळी अनेक प्राथमिक रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णालयात स्वच्छता नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अधिकारी रागवले. या पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी केलेल्या पथकासोबत व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी संवाद साधला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या. योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. पावसाळ्या आधी जिल्हा प्रशासन व गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुका प्रशासन नगरपंचायत ग्रामपंचायत व गावकर्यांच्या माध्यमाने स्वच्छतेवर भर दिला जाईल. मलेरिया नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन अनेक प्रयत्न करीत आहे, अशी महिती जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिली. आरोग्य विभागाचे मुख्य सचिवांनी दिलेल्या भेटीनंतर ते बोलत होते.
आठ किलोमीटरची पायपीट
गडचिरोली हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग. येथील बिनागुंडा डोंगर भागात मलेरियानं हातपाय पसरविले. मलेरियाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य संचालकांचं पथकं जंगलात गेले. पायी प्रवास केला. आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यासाठी सुमारे आठ किलीमीटरचा पायी प्रवासही या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना करावा लागला. गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया थांबण्यासाठी उचलले जात आहे. नेमका कसा होता खडतर पायदळी प्रवास व मलेरियाच्या स्वच्छतेबाबत उपाय योजना केली जाईल. आरोग्याच्या मुख्य सचिव यांच्याकडून गडचिरोलीचे प्रतिनिधी मोहम्मद इरफान यांनी आढावा घेतला.