Maratha Morcha Kolhapur Live : संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांचं निमंत्रण
Maratha reservation Sambhaji Chhatrapati Live : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात पहिला मराठा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा पहिला मोर्चा आहे
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात या मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची दिशा जाहीर केली. त्यानुसार हा मोर्चा काढण्यात आला. (First Maratha Morcha) हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी आहे. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. (Maratha Morcha Kolhapur Live update today Maharashtra Maratha reservation demands by Sambhaji Raje Chhatrapati)
या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, कोल्हापुरात आज जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मोठ्या पावसात हा मराठा मोर्चा काढण्यात आला.
LIVE NEWS & UPDATES
-
संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांचं निमंत्रण
राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करणे आमचं कर्तव्य, सुप्रीम कोर्टातील वकिलांची टीम आपण बदलली नाही. केंद्र आणि राज्याच्या समनव्याची जबाबदारी संभाजीराजे तुमची आहे, राजेंनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक आहे, मुख्यमंत्री आणि प्रमुख मंडळींना आपल्यासोबत बसून चर्चा करायची, उद्या तुम्ही मुंबईलाला यावं, उद्या मुख्यमंत्री, अजितदादा भेटतील आहे, राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, हातात हात घालून चालायला हवं, संयमाच्या भूमिकेचं कौतुक आहे, संयमाला चर्चेची साथ देऊ, राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो, असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं.
-
खासदार धैर्यशील माने सलाईन लावून मराठा मोर्चात
मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यावेळी सलाईन लावून मराठा मोर्चात सहभागी झाले.
हाताला सलाईनची सुई, अंगात अशक्तपणा, तरीही शिवसेनेचा खासदार भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी! https://t.co/ECcffOJxfk #MarathaMorcha | #MarathaReservation | #Kolhapur | #DhairyasheelMane | @mpdhairyasheel | @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2021
-
-
48 खासदारांनी एकत्र यावं, मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे : धैर्यशील माने
महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व प्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल. आरक्षण कोणामुळे थांबलं, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले.
न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला. हा राज्याचा की केंद्राचा हा प्रश्न समाजाला आहे..एका बाजीला जनरेटा तयार होतोय, 48 खासदारांनी अधिवेशनाची मागणी करावी, लोकसभेच आधिवेशन मराठा समाजासाठी झालं पाहिजे, राजेंनी संयमाने भूमिका घेतली आहे
-
मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर, चंद्रकांतदादांची एन्ट्री
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनात येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचं निवेदन दिलं आहे.
मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर, चंद्रकांतदादांची एन्ट्री, काळे कपडे घालून मराठा आंदोलकांचा मूकमोर्चा सुरूhttps://t.co/3VnM6lB0zY#MarathaReservation | #mukmorcha | #marathamukmorcha | #sambhajichhtrapati | #prakashambedkar | #Kolhapur | #chandrakantpatil
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2021
-
Maratha Morcha : सतेज पाटील, राजेंद्र यड्रावकरांसह आमदार-खासदारांची हजेरी
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक मराठा आंदोलनस्थळी दाखल, छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी दिग्गज नेते उपस्थित
-
-
Prakash Ambedkar Maratha Morcha : प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात दाखल, मराठा आरक्षण आंदोलनस्थळी छत्रपती शाहू महाराजांना नमन, काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला.
-
Maratha Morcha : कोल्हापूरचा नागरिक या नात्याने मोर्चात : चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठा मोर्चात सहभागी, नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे, मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल, येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
-
Maratha Muk Morcha : मराठा मूक मोर्चा
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात 16 जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी पहिलं आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर असल्याने कोल्हापुरात याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शाहू समाधी स्थळाचा परिसर भगवामय झाला आहे.
Published On - Jun 16,2021 9:43 AM