गडचिरोलीत पार पडला सामूहिक विवाह सोहळा, शंभराच्या वर जोडपी विवाहबद्ध, आत्मसमर्पित नक्षल्यांचाही समावेश
गडचिरोली जिल्ह्यात आज मैत्री परिवार व गडचिरोली पोलीस दलाकडून 116 सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. त्यात सोळा आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा समावेश होता. मैत्री परिवार व गडचिरोली पोलिसांकडून हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे.
गडचिरोली : कोरोनामुळं गेली दोन वर्षे सामूहिक विवाह सोहळे (Mass Marriage Ceremony) रद्द झाले होते. आता हे सोहळे पुन्हा सुरू झाले आहेत. गर्दी जमायला लागली आहे. हजारो लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कोरोना कमी झाला. त्यामुळं हे पुन्हा नव्यान सुरू झालंय. 2017 व 18 मध्ये ही आत्मासर्मपित नक्षलवाद्यांचे (Naxalites) लग्न सोहळा पार पडला होता. कोरोना काळ असल्यामुळे मागील दोन वर्षे हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला नाही. आज यंदा मोठ्या उत्साहाने हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. मैत्री परिवार (Friendship Filamy) व गडचिरोली पोलिसांकडून विवाहबध्द झालेल्या कुटुंबांना घरगुती वापरात येणारे साहित्य व सामान वाटप करण्यात आले. सामूहिक लग्न सोहळ्याकरिता गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, सोमनाथ मुंडे व गडचिरोलीचे आमदार देवराव होळी, मैत्री परिवाराचे संस्थापक संजय भेंडे व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
16 आत्मसर्मपित नक्षलवादी कुटुंबात रमणार
या सामूहिक विवाह सोहळ्यात 16 आत्मसर्मपित नक्षलवाद्यांचे लग्न संपन्न झाले. एकूण 116 विवाहबद्ध झालेल्या कुटुंबांना मैत्री परिवार व गडचिरोली पोलिसांकडून घरगुती सामान व साहित्य वाटप करण्यात आले. जंगलात बंदूक घेऊन फिरणाऱ्या या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पित करून नवीन जीवन देण्याचे काम गडचिरोली पोलिसांनी केले आहे. या सामूहिक विवाह सोहळ्याच्या उपक्रमामुळे अनेक युवकांना आपले कुटुंब नव्याने सुरू करण्याची एक संधी गडचिरोली पोलिसांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात आज मैत्री परिवार व गडचिरोली पोलीस दलाकडून 116 सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. त्यात सोळा आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा समावेश होता. मैत्री परिवार व गडचिरोली पोलिसांकडून हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे.