AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जत-जामखेडच्या आर्थिक विकासासाठी आमदार रोहित पवार थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटले; सीतारामन यांच्याशी तासभर चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची रोहित पवार यांनी मंगळवारी (14 सप्टेंबर) भेट घेऊन कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली.

कर्जत-जामखेडच्या आर्थिक विकासासाठी आमदार रोहित पवार थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटले; सीतारामन यांच्याशी तासभर चर्चा
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 6:05 PM

नवी दिल्ली : कर्जत-जामखेडच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आणि आमदार रोहित पवार कार्यरत आहेत. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची रोहित पवार यांनी मंगळवारी (14 सप्टेंबर) भेट घेऊन कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली. (MLA Rohit Pawar discusses Karjat-Jamkhed economic well-being with Finance Minister Nirmala Sitharaman)

कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण भागातील गरिबीचा सापळा तोडण्यात यशस्वी सिद्ध झाला आहे, यामुळे ग्रामीण दैनंदिन मजुरी करणाऱ्या कामगारांचे राहणीमान सुधारले आहे. ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लिंग समानता सुधारणे, स्थानिक राजकारणात सहभाग वाढवणे, सार्वजनिक संपत्ती वाढवण्यास मदत झाली आहे. याच धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा यासाठी आमदार पवार यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.

सोबतच मतदारसंघात आर्थिक व्यवहारांसाठी बँकांची असलेली संख्या कमी आहे, त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये काही समस्यांना तोंड द्यावे लागते. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने सावकारकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जातोय. या परिस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार याठिकाणी अधिक प्रमाणात वाढावे आणि येथील स्थानिक नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना संघटीत बँकिंग व्यवस्थेच्या मदतीने अर्थसहाय्य मिळावे यासाठी रोहित पवार प्रयत्नशील आहेत. केंद्राच्या अखत्यारीत असणारा हा विषय मार्गी लावण्यासाठी आ. रोहित पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन विनंती केली.

शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बँकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय वयोश्री योजनेत अहमदनगरच्या समावेशासाठी निवेदन

आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये असता केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन राष्ट्रीय वयोश्री योजनेत- RVY अहमदनगर जिल्हा समाविष्ट करण्यासाठी निवेदन दिले. RVY ही देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भौतिक सहाय्य आणि सहाय्यक-जीवन उपकरणे पुरवण्यासाठी एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. ही योजना दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ज्याचा उपयोग येथील नागरिकांना होईल. अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असताना देखील समाविष्टीत नसल्याने करण्यात आले नसल्याने याचा समावेश करण्यात यावा अशी विनंती केली, जेणेकरून जिल्ह्याला आणि पर्यायाने कर्जत आणि जामखेडला याचा फायदा होईल.

USTTAD च्या अंमलबजावणीसाठी कर्जत-जामखेडचा समावेश करण्याची विनंती

केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन USTTAD च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती नकवी यांना रोहित पवार यांनी निवेदनाद्वारे केली. याचसोबत अल्पसंख्याकांच्या इतर योजनांची अहमदनगर जिल्हा आणि कर्जत – जामखेडमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी विनंती केली.

इतर बातम्या

ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणूक, तरीही नागपूर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीचा कस लागणार; वाचा काय आहे समीकरण?

Aurangabad Top 5: औरंगाबादकरांसाठी आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या, जाणून घ्या मोजक्या शब्दात

सुप्रिया सुळेंचा दरेकरांच्या विधानावर बोलण्यास नकार, म्हणाल्या; माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार

(MLA Rohit Pawar discusses Karjat-Jamkhed economic well-being with Finance Minister Nirmala Sitharaman)

बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.