धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत अपघात की घातपात?

ते अंगावर येत असल्याचे पाहताच त्यांनी उडी मारली. त्यानंतर पाठीमागून येत असलेल्या उमेश थोडसरे यांच्यात मोटर सायकलवर पाठलाग केला.

धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत अपघात की घातपात?
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 10:16 PM

संतोष जाधव, प्रतिनिधी, धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर हे रोज सकाळी व्यायामासाठी बाहेर पडतात. आज सकाळी ते गोवर्धनवाडी ते तेर या रोडवर व्यायामासाठी जात होते. तेवढ्यात एक दुर्घटना घडता घडता वाचली. सीड फार्मजवळ पाठीमागून जोरदार वाहनाचा आवाज आला. त्यावेळी एक भरधाव टिप्पर एमएच 44 के 8844 आले. ते अंगावर येत असल्याचे पाहताच त्यांनी उडी मारली. त्यानंतर पाठीमागून येत असलेल्या उमेश थोडसरे यांच्यात मोटर सायकलवर पाठलाग केला. त्यावेळी टिप्पर रेल्वे फाटकवर थांबले होते.

ड्राइव्हरने त्याचे नाव रामेश्वर कांबळे सांगितले. तो बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील आहेत. हा प्रकार ओव्हरटेक करताना चुकीने घडल्याचे सांगितले. कलम 279, 336, 184 अन्वये ढोकी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास राजाभाऊ सातपुते हे करीत आहेत.

वाहन खासदारांच्या अंगावर घातले तेवढ्यात

धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी व्यायाम करायला जात असताना थोडक्यात बचावले. एका टिप्पर चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवत ते खासदार ओमराजे यांच्या अंगावर घातले. मात्र ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खाली उडी मारली. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. त्यानंतर त्या टिप्परचा पाठलाग करीत एकास पकडले.

पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार मोटार सायकल ओव्हरटेक करताना चुकीने घडला असल्याचे चालकाने सांगितले. हा घातपाताचा प्रकार की दुसरे काही याचा पोलीस तपास करीत आहेत. मी सुखरूप असून सुदैवाने वाचलो. मरण काय असते हे मी पहिले अशी प्रतिक्रिया ओमराजे यांनी दिली.

अपघात की घातपात

वाहन चालक हा मोबाईल खेळत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. वाहन चालवताना सावध असणे आवश्यक आहे. अन्यथा अपघात होऊ शकतात. ओमराजे निंबाळकर हे अलर्ट होते. त्यामुळे त्यांनी बाजूला उडी मारली. यात ते बचावले. यापूर्वी त्यांच्यावर एकदा चाकूहल्ला झाला होता. त्यामुळे ही घटना अपघात की, घातपात अशी चर्चा सुरू झाली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.