Video | यवतमाळमध्ये घरकुल यादीत तफावत, सरपंच, लाभार्थ्यांकडून जिल्हा परिषद कार्यालयाची तोडफोड
यवतमाळ तालुक्यातील सरंपच आणि उपसरपंच यांनी जिल्हा परिषदेच्या डीआरडीए कार्यालयावर धडक दिली. तसेच अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी तोडफोड केली.
यवतमाळ : घरकुलाच्या प्रपत्र ड यादीतून पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचा आरोप करत सरपंच, उपसरपंच तसेच नागरिकांनी यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयाची तोडफोड केली. यवतमाळ तालुक्यातील सरंपच आणि उपसरपंच यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर धडक दिली. तसेच अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी तोडफोड केली. (name removed from gharkul list sarpanch and beneficiary vandalized Zilla Parishad office of yavatmal)
अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे तोडफोड
मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ तालुक्यातील काही घरकुलच्या लाभार्थ्यांना प्रपत्र ड यादीतून वगळण्यात आले. ज्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत. प्रपत्र यादीतून नाव का वागळण्यात आले, हे विचारण्यासाठी तालुक्यातील सरपंच तसेच उपसरपंच आणि नागरिक जिल्हा परिषद कार्यालयामध्ये गेले. मात्र अधिकाऱ्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. परिणामी सरपंच, उपसरपंच तसेच नागरिकांनी जिल्हापरिषदेत तोडफोड केली. त्यांनी कार्यालयात संगणक, तावदाने फोडले. कागदपत्र फेकून प्रकल्प संचालकांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढली.
पाहा व्हिडीओ :
जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा
त्यानंतर घरकुल यादीत तफावत असल्याचा आरोप करीत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि वंचित लाभार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
इतर बातम्या :
शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार, धनंजय मुंडेंची ग्वाही
आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग, गळा आवळून डॉक्टरला फासावर लटकवलं, हत्येचा उलगडा होताच खळबळ
पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका, सचिनने भावनिक पोस्ट करत व्यक्त केल्या भावना, म्हणाला…https://t.co/kQUERVhBIs#inzamamulhaq | #InzimamulHaq | #SachinTendulkar
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2021
(name removed from gharkul list sarpanch and beneficiary vandalized Zilla Parishad office of yavatmal)